गुन्हे शाखेच्या धाडीत गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त

-आठ जणांना पोलिसांच्या ताब्यात

0

गुन्हे शाखेच्या धाडीत गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त

-आठ जणांना पोलिसांच्या ताब्यात

दौलताबाद : धुळे-सोलापूर रस्त्यावरील जांभाळा गावात एका हॉटेलसमोर गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त करण्यात आली असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एका कंपनीच्या शेडमध्ये गुन्हे शाखेने धाड टाकली असता हजारो किलो गोमांस हस्तगत करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती.

छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मानद पशुकल्याण अधिकारी राहुल कदम आणि त्यांच्या पथकाने पुरवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकला. या कंपनीत अवैधरीत्या कत्तल करून गोमांस पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याचा संशय आहे. शनिवारी सकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने दौलताबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जांभाळा येथील एका कंपनीवर धाड टाकली. तेथे आणि नजीकच्या हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ९ गाड्यांमध्ये हजारो किलो गोमांस सापडल्याने ही सर्व वाहने जप्त केली आहेत.

मानद पशुकल्याण अधिकारी राहुल कदम, प्रकाश खोले, अथर्व सारडा या पुण्याहून आलेल्या पथकाने पोलिसांना ही गुप्त माहिती पुरवली होती. छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेतर्फे संदीप गुरमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोहोचून याची खात्री करून ही कारवाई केली. एका मोठ्या शेडमधे मोठ्या प्रमाणात गोमांसाची साठवण केल्याचे व ते पॅकिंग केले जात असल्याचे तेथे आढळून आले.

तिसºयाच दिवशी कारवाई

काही दिवसांपूर्वीच दौलताबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीत माळीवाडा परिसरात ८०० किलो गोमांस घेऊन जाणारे वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तिसºयाच दिवशी ही कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.