सततच्या पावसामुळे पिके संकटात
-कृषी विभागाचे अधिकारी बांधावर येत नसल्याने शेतकरी नाराज
फुलब्री : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरू आहे. याचा खरिपाच्या एक लाख हेक्टरवरील पिकांवर परिणाम होत आहे. पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. यातच कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नसल्याने शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, माउली मुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
शेतकरी रावसाहेब मगरे यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे बदलत्या वातावरणामुळे सोयाबीन, कपाशी, तुरीला मारुका तर कपाशीला बोंडअळीचा धोका निर्माण झाला आहे. ऐन बहरात असलेल्या या पिकांवरील किडीपासून बचाव केला तरच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. ढगाळ वातावरण आणि हवेतील गारवा यामुळे धुई पडत आहे. बदललेल्या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत आहे. तुरीवर मारुका अळी, कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही तिन्हीही पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यात भाजीपाला, फळबागांवरदेखील अळ्यांचे प्रमाण वाढले आहे.
iQOO Z9 Lite 5G 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 5G स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 128GB स्टोरेज
नवीन Vivo Y18i स्मार्टफोन 8 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च, त्याचे फीचर्स जाणून घ्या
पावसाळ्यात घ्या काळजी अन्यथा आजारी पडाल- ११ आरोग्यदायी टिप्स
सततच्या पावसामुळे पिके संकटात
मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी तूर पीक फुलोऱ्यांच्या पूर्वी शेतात सर्वेक्षण करावे. २० ते २५ ठिकाणी प्रतिमीटर ओळीच्या अंतरात अळी दिसून आल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी. बुरशीचाही धोका टाळण्यासाठी फ्लूबेंडामाइड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू. पी २० ग्रॅम किंवा नोवलुरोन ५.२५, इंडोक्झाकार्ब ४.५०, एससी १६ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन पैठण तालुका कृषी अधिकारी संदिप शिरसाट यांनी शेतकºयांना केले आहे.
सूचनांचे पालन करा
शेतकरी पिकांवरील रोगराई आटोक्यात आणण्यासाठी विविध महागड्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. पण फवारणी करताना काही सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. फवारणी करताना हवेच्या दिशेने म्हणजे अंगावर फवारणीचे द्रव्य पडणार नाही, याची काळजी घ्यावी. फवारणी करतांना फवारणी किटचा वापर करावा. तोंडाला मास्क, डोळ्यांवर गॉगल, पाय पूर्ण झाकतील असे बुट, जेणेकरून योग्य काळजी घेतल्यास विषबाधेपासून वाचता येते.