पराभव समोर दिसत असल्याने दादांची महायुतीत घुसमट

-खासदार अमोल कोंल्हेंची अजित पवारांवर बोचरी टीका

0

पराभव समोर दिसत असल्याने दादांची महायुतीत घुसमट

-खासदार अमोल कोंल्हेंची अजित पवारांवर बोचरी टीका

बीड : चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असतात. साडेबावीस वर्ष अजितदादा सत्तेत होते. ते फक्त दोनदा विरोधात होते. त्यामुळे ६६% सत्तेत आणि 33 टक्के विरोधात अशी दादांची कारकीर्द राहिलेली आहे. त्यांना आता पराभव समोर दिसत असल्याने महायुतीत दादांची घुसमट होत आहे. यामुळे दादांना निवडणुकीत रस वाटेनासा झाला का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे, असा सवाल खा. अमोल कोल्हेंनी उपस्थित केला आहे. ते बीडमध्ये शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

शरद पवार यांचे बोट सोडण्याचा निर्णय घेतला त्यांची मला मला जास्त चिंता वाटते. विकासासाठी गेलो असे म्हणतात मग बीड जिल्ह्यातील किती तरुणांना रोजगार मिळाला? असा सवाल करीत कोल्हेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. सत्ता येते जाते भूमिका घेतल्या जातात पण जनतेशी प्रामाणिकपणा राहिला पाहिजे. तरुणांच्या हाताला काम पाहिजे. या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री किती यशस्वी झाले त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा, असे आव्हान त्यांनी धनंजय मुंडेंना केले.

सैन्यांनी लढायचे कसे?

सेनापतीच गळपटला तर सैन्यांनी लढायचे कसे? असा सवाल कोल्हे यांनी अजित पवार यांना विचारून जोरदार टीका केली. बीड शहराला वीस दिवसाला पाणीपुरवठा होत असेल तर याला विकास म्हणायचा का? उद्धव ठाकरे यांना चाहता वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत सुद्धा मॅन आॅफ द मॅच प्रचाराच्या बाबतीत होते. उद्धव ठाकरे प्रचार प्रमुख असतील तर महाविकास आघाडीला आणखी बळकटीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चांगली गोष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.