वस्तीगृहातील मुलीचा मृत्यू ; खून व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

शिक्षणाचे माहेरघर लातुर येथील हृदयद्रावक घटना

0

वस्तीगृहातील मुलीचा मृत्यू ; खून व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

शिक्षणाचे माहेरघर लातुर येथील हृदयद्रावक घटना

लातूर (वा.) : लातूर शहराच्या पूर्व भागात असलेल्या एका मागासवर्गीय मुलीच्या वस्तीगृहात निवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर तिचे दुसऱ्यांदा सोलापूर येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्यात आलेल्या अहवालानुसार वस्तीगृह चालविणाऱ्या संचालिका व तिचे दोन मुले यांच्या विरोधातभादंवि 302,भादंवि 376(2) (एफ), 354 नुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका मुलींच्या मागासवर्गीय वस्तीगृहात अनेक मुली राहतात. त्याचप्रमाणे एका मजुराच्या दोन मुली त्याच वस्तीगृहात राहत होत्या. 28 जून रोजी सकाळी वस्तीग्रह संचालिकेचा संबंधित मुलीच्या वडिलांचा फोन केला, त्यामध्ये तुमची मुलगी दोरी मध्ये पाय अडकून पडली असल्याचे सांगून, त्या हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही तात्काळ या असा निरोप यावेळी दिला. मुलींचे वडील हॉस्पिटलमध्ये गेले असता तुमची मुलीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांच्या मनात शंका निर्माण झाली.

काही दिवसापूर्वीच त्या मुलीने वडिलांकडे आमचा वस्तीगृहातील संचालिकेच्या नातेवाईकांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे. याबाबत वस्तीगृहाच्या संचालिकीकडे तक्रार केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान लातूर येथेच त्या अल्पवयीन मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले व पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली.

वस्तीगृहातील मुलीचा मृत्यू

मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्याने मुलीचे इतरत्र शवविच्छेदन करावे तेही इन कॅमेरा करावे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आम्ही पुढील प्रक्रिया करणार नाहीत अशी भूमिका कुटुंबाने घेतली. त्यानंतर त्या मुलीचे शवविच्छेदन दुसऱ्यांदा सोलापूर येथे करण्यात आले, त्या अहवालामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मयत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे आपली बाजू मांडल्यानंतर या प्रकरणात वस्तीग्रह चालविणाऱ्या संचालिका व तिचे दोन मुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वस्तीगृहात घडलेल्या या घटनेमुळे लातूर शहरातील वसतिगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.