काँगेसच्या वतीने मंत्री अनुराग ठाकूर विरोधात निदर्शने
जालना : जात निहाय जनगणना करण्यास कटिबध्द असलेले काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोध पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना संसदेत चार्तुवर्ण व्यवस्थेच्या विचारधारेतून भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी गांधी यांची जात विचारुन अपमान केल्याप्रकरणी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवारी गांधी चमन येथे आक्रमक आंदोलन करीत निदर्शने केली.
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण राज्यात गुरुवार रोजी भाजपच्या या चातुवर्ण व्यवस्थेच्या विचारधारे विरुध्द काँग्रेस पक्षाच्यातीने जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे खा. अनुराग ठाकूर आणि भाजपाच्या जातीयवादी विचारांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आ. कैलास गोरंट्याल यानी खा. राहुल गांधी यांच्याविषयी भाजपाने त्यांच्या जातीचा उल्लेख करुन अपमानीत केल्याबद्दल निषेध व्यक्त करुन खा. ठाकूर यांनी जाहीर माफी मागावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा राजेंद्र राख, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे, जालना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
शरद पवारांसोबत तुमचे बोलण काय झाले? – मराठा मावळा संघटना
मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याकडे आमदार शिरसटांनी फिरवली पाट
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पाठीत लाथ घाला – मनोज जरांगे पाटील आक्रमक
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख हमेमूद बोलतांना म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये चातुवर्ण व्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. खा. राहुल गांधी हे देशातील प्रत्येक जातीधमार्तील लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी जातीय जनगणना व्हावी म्हणून आक्रमकपणे लोकसभेत बाजू मांडत असतांना भाजपाचे जातीयवादी खा. अनुराग ठाकूर यांनी गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल देशातील लोकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे.