संभाजी ब्रिगेडचा लोकशाहीचा जागर महामेळावा २३ ऑगस्ट रोजी पुण्यात

-आगामी निवडणूकीसंदर्भात चर्चा आणि विचारमंथन होणार : प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे

0

संभाजी ब्रिगेडचा लोकशाहीचा जागर महामेळावा २३ ऑगस्ट रोजी पुण्यात

-आगामी निवडणूकीसंदर्भात चर्चा आणि विचारमंथन होणार : प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणूक आणि संभाजी ब्रिगेडची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी लोकशाहीचा जागर महामेळावा २३ ऑगस्ट रोजी पुणे येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यात आगामी निवडणूकीसंदर्भात चर्चा आणि विचारमंथन होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली.

यावेळी प्रदेश प्रवक्ता डॉ. भानुसे म्हणाले की, या मेळाव्यात समाजाला योग्य दिशा देण्यासाठी धोरण ठरवणे, शेतकरी, कष्टकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा आणि विचार करून ते सोडविण्यासाठी सरकारला प्रस्ताव देऊन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी रणनीती ठरविणे. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून पक्ष संघटन बळकटीकरण करणे, येणाºया विधानसभा निवडणूकीच्या मैदानात संभाजी ब्रिगेड उतरणार आहे. संभाजी ब्रिगेडची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती असल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला सहकार्य केले. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारदम्यान संभाजी ब्रिगेडच्या अनेक वक्तयांनी महाविकास आघाडीच्या सभा आपल्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण शैलीने जोरात गाजविल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश संपादन केले आहे.

संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरवणार

आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे. हा लोकशाहीचा जागर महामेळावा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अ‍ॅड.मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली व महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, गजानन पारधी यांच्यासह केंद्रीय कार्यकारणीच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती डॉ. भानुसे यांनी दिली.

अपेक्षित जागा मिळतील

आगामी विधानसभा निवडणूकीत अपेक्षित जागा मिळतील अशी अपेक्षा असून यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. या निवडणूकीत संभाजी ब्रिगेडला सन्मानपूर्वक वाटा देणार असल्याचे ठाकरे यांनी कबूल केल्याने अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास देखील भानुसे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.