कन्नड शहरात डेंग्यूचे थैमान
जंतुनाशक पावडर व धूरफवारणीचे काम संथगतीने सुरू
कन्नड : मागील दोन महिन्यांपासून डेंग्यूची साथ रोखण्यासाठी नगर परिषद व आरोग्य विभागाकडून कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने कन्नड शहरात डेंग्यूचे थैमान घातले आहे. जंतुनाशक पावडर व धूरफवारणीचे कामदेखील अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांत शहरात ५० डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे दिसत आहे. वेळेत उपाययोजना झाल्या नाहीत, तर रूग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी धरणात अत्यल्प पाणी असल्याने नगर परिषदेकडून आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्या पाण्यात जंत होतात. दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साठले आहे. या पाण्यामुळेही डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हिवताप, मलेरियाचे रुग्ण शहरात आहेत. डेंग्यूची अशी आहेत लक्षणे डेंग्यूचा विषाणू एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासांमार्फत पसरतो. एडिस डास आपल्या निवासस्थानाजवळ सहज सापडणाऱ्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो.
मराठा समाजाचे आरक्षण फडणवीसांनी रोखले – मनोज जरांगे पाटील
संभाजीनगरातील 5 मतदार संघावर भाजपचा दावा
परळी येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव
कन्नड शहरात डेंग्यूचे थैमान: पाण्यामध्ये सर्व डासांंची पैदास होते, त्यामुळे वातावरण कोरडे व स्वच्छ ठेवून डासांची उत्पत्ती थांंबवता येते. घराच्या अवतीभवती किंवा गच्चीवर असलेल्या रिकाम्या कुंड्या, टायर, प्लास्टिकच्या वस्तू, फ्लॉवर पॉट किंवा कूलर यांसारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची उत्पती होते. अशी ठिकाणे नष्ट करून कोरडा दिवस पाळल्याने आळा घालता येतो.
डेंग्यू असलेल्या रुग्णाला चावलेला डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा त्या व्यक्तीलासुद्धा डेंग्यूची लागण होते. ताप येणे, तीव्र पोट दुखणे, सतत उलट्या होणे, हिरड्या किंवा नाकातून रक्त येणे, त्वचेखाली रक्तस्राव, कठीण किंवा जलद श्वास घेणे, त्वचेवर अनेक पुरळ आणि जखमा, डोळ्यांच्या मागे वेदना आणि तीव्र डोकेदुखी, रुग्णाला ३ ते ७ दिवस जास्त तापाने अशक्त वाटू शकते, असे डॉ. महेश काचाळे यांनी सांगितले.
लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
तालुक्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खासगी दवाखान्यात १८ व ग्रामीण रुग्णालयात एक रुग्ण डेंग्यूचा आढळून आला आहे. येत असल्यास अथवा लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण पवार यांनी सांगितले.