मोर्चाची परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढणारच

- कोण आडवते, ते आम्ही बघू कडू यांचा इशारा

0

मोर्चाची परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढणारच

– कोण आडवते, ते आम्ही बघू कडू यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शहरात मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले होते. या मोर्चाच्या माध्यमातून ते महायुती सोबत असतील की महाआघाडी सोबत, याचा निर्णय देखील जाहीर करणार आहेत. मात्र आता पोलिसांनी या मोर्चाची परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत असली तरी आम्ही आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त करीत आम्हाला कोण आडवते, ते आम्ही बघू, असा इशारा कडू यांनी दिला आहे.

मोर्चाची परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढणारच

लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार दिला होता. आमदार बच्चू कडू हे मागील काही महिन्यांपासून त्यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुती सोबत राहणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले होते. राजू शेट्टी, इम्तियाज जलील, रविकांत तुपकर यांच्यासह अनेक छोट्या पक्षाच्या नेत्यांनी आता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. या संदर्भात कडू यांची नेमकी भूमिका काय? हे या मोर्चात जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमची ताकद दाखवून देऊ

संभाजीनगर येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकत्र येणार आहेत. एकीकडे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील या माध्यमातून सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ९ ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला असला तरी या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याने हा मोर्चा निघणार की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.