भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन

0

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे रविवारी चेन्नईत निधन झाले. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल हे अधिकाº्यांसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या चेन्नई दौºयाच्या तयारीचा आढावा घेत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागले, यामुळे त्यांना राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राकेश यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी लिहिले भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक श्री राकेश पाल यांच्या चेन्नईत झालेल्या अकाली निधनाने खूप दु:ख झाले. ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी मोठी प्रगती करत आहे. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.

२०१८ मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक


राकेश यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांना महासंचालकची जबाबदारी मिळाली होती. यापूर्वी त्यांनी कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र, उपमहासंचालक, अतिरिक्त महासंचालक अशी पदे भूषवली आहेत. त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत जहाजांवरही तैनात होते. त्यांना २०१३ मध्ये तटरक्षक पदक आणि २०१८ मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक मिळाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.