चर्चा : विवाह अंदोलन पत्रिकेची

मानाच्या कलवऱ्या' चंपा आत्या, छगुताई अर्थात (चंद्रकांत पाटील? आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

1

चर्चा : विवाह अंदोलन पत्रिकेची

मानाच्या कलवऱ्या’ चंपा आत्या, छगुताई अर्थात (चंद्रकांत पाटील? आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

भूम : सध्या मराठा आरक्षणाचा विषय सुरू असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना घेरण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यामध्ये विधान परिषदेत अर्थात मागच्या दाराने गेलेले परिणय फुके, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर हे नेहमी जरांगे पाटील यांनी डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात सध्या सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सदरील लग्न पत्रिका ही ‘विवाह अंदोलन पत्रिक’ अशा नावाने शेअर होत आहे. यामध्ये पत्रिकेत स.न.वि.वि. मराठ्यांच्या जिवावर उठलेल्या खिद्रावळींच्या अवकृपेने…. असे लिहून महाविकास आघाडी व युतीला टोला मारल्याचे दिसत आहे. या पत्रिकेत ‘वधू’ म्हणून दगलबाज महायुती तर ‘वर’ म्हणून ‘निष्ठूर महाविकास आखाडी’चा उल्लेख केल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये यांचा ‘अ’ शुभविवाह म्हणत असताना, ‘मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी सत्तेतील महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी कोणीही तयार नाहीत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दोघेही एक होतात म्हणून या दोघांचे प्रतिकात्मक विवाह अंदोलन करुन सुखाने नांदण्यासाठी गुरुवार दि. २५ जुलै २०२४ रोजी दु. १२.३० च्या ठोक्याला ठरलेला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे, असे म्हटले आहे. या पत्रिकेत ‘आपले विनीत’ मध्ये हताश, हतबल आणि निराश झालेला सकल मराठा समाज भूम जि. धाराशिव असा उल्लेख असल्याने ही पत्रिका भूम तालुक्यातील मराठा समाजाने सरकारचा निषेध म्हणून बनविल्याचे दिसत आहे.

या पत्रिकेत ‘हळदी समारंभ’ गुरुवार दि. २५ जुलै सकाळी
१०.०० वा. गांधी चौक भूम तर ‘विवाहस्थळ’ हे गुरुवार दि. २५ जुलै दु. १२.३० वा. (गोलाई) छत्रपती शिवाजी महाराज चौक भूम असे लिहिले असून यामध्ये आमच्या मालकांच्या लग्नाला यायचं हं..! यात निलु, सदु, पवु, परसु, राजा, गोपु, तानु, गुन्या. यांचा उल्लेख करून ‘मानाच्या कलवऱ्या’ चंपा आत्या, छगुताई अर्थात (चंद्रकांत पाटील? आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.) यात टीपमध्ये शेवटी म्हटले की, लगीन लबाडांचे आहे म्हणून जेवनाची व्यवस्था नाही तसेच महत्वाची टिपमध्ये सांगितले की, मांडवाच्या डाव्या बाजूस आहेर स्विकारले जातील. आहेर अंदोलनास वापरला जाईल.

1 Comment
  1. Pradeep says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.