सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नये

-कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, पोलिस प्रशासनाचा इशारा

0

सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नये

-कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, पोलिस प्रशासनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : शहरांमध्ये सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे समाजात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करीत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ट्विटर अशा कोणत्याही सोशल मीडिया वरती आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

यावेळी शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, कुठल्याही समाज विघातक कृत्यात सहभागी होऊ नका, किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. असे केल्यास त्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.

वैजापूरच्या गोदावरी धाम सराला बेट येथील रामगिरीने मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रामगिरीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या संतापाची दखल घेत रामगिरीविरोधात येवल्यात एक, वैजापूरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात तीन असे एकूण ५ गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिस प्रशासनास सहकार्य करा

पोलिस आयुक्त यांनी शहरातील नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक इ. सोशल मीडिया द्वारे आक्षेपार्ह स्टेटस, रील्स, स्टोरी प्रसारित करू नये. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ट्विटर वरती कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ पाठवू नये. ज्या व्यक्ती आक्षेपार्ह पोस्ट करतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे म्हटले.

रामगिरी विरोधात गुन्हा दाखल

मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरींविरोधात राज्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये येवला, संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, नगरमध्ये जमाव आक्रमक झाल्याने पोलिस प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.