आर्थिक संकटात सापडलेल्या पाकमध्ये गाढवांच्या संख्येत वाढ

-चीनला दरवर्षी सरासरी ५ लाख गाढवांची निर्यात

0

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकमध्ये गाढवांच्या संख्येत वाढ

-चीनला दरवर्षी सरासरी ५ लाख गाढवांची निर्यात

इस्लामाबाद : जगात गाढव पालनाच्या बाबतीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक लागतो. २०२२ मध्ये पाकिस्तानात गाढवांची लोकसंख्या ५८ लाख होती. सध्या पाकिस्तान दरवर्षी चीनला सरासरी ५ लाख गाढवांची निर्यात करतो, तरीही देशातील गाढवांची संख्या १ लाखांनी वाढली आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकमध्ये गाढवांच्या संख्येत वाढ: मागील वर्षी पाकिस्तान सरकारने म्हटले होते की, आता गाढवांच्या विक्रीतून परकीय गंगाजळी मिळेल. पाकच्या मंत्रिमंडळाने चीनला गाढवाच्या कातडीसह गुरे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या नियार्तीलाही मंजुरी दिली होती. पाकिस्तानमध्ये ८० लाख लोक पशुपालनाचे काम करतात. चीनमध्ये गाढवांच्या नियार्तीतून लोकांच्या कमाईत ४०% वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीने नऊ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हे टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने लोकांना गाढवे पाळण्याचे आवाहन केले होते. सरकार ही गाढवे चीनला विकत आहे.

चीनमध्ये गाढवाच्या मासाला मोठी मागणी

चीनमध्ये गाढवाचे मांस, दूध आणि कातडीला मोठी मागणी आहे. गाढवाचे मांस हे चीनमधील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. चीन हा जगभरातील गाढवांचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. चीनमध्ये औषधासाठी गाढवांना नेहमीच मागणी असते. चीनमध्ये गाढवांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पाकिस्तानातील ८० लाखांहून अधिक लोक या व्यापारावर अवलंबून आहेत. चीन जगात सर्वाधिक गाढवांची निर्यात करतो. तर पाकिस्तान तिसºया क्रमांकावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.