संभाजीनगर ते नगर नवीन रेल्वेमार्गाचा डीपीआर नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार
-मार्गाचे दुहेरीकरण किमान दोन वर्षे लांबणीवर
संभाजीनगर ते नगर नवीन रेल्वेमार्गाचा डीपीआर नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार
-मार्गाचे दुहेरीकरण किमान दोन वर्षे लांबणीवर
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर ते नगर या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा डीपीआर नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार, असे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. त्यामुळे या मार्गाचे दुहेरीकरण किमान दोन वर्षे लांबणीवर पडणार आहे. यासंदर्भात मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी दक्षिण मध्य आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक
संभाजीनगर ते नगर या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या डीपीआरमध्ये साडेपाच किमी डोंगराचा अडथळा होता. म्हणून नगर जिल्ह्यातील वांबोरी गावाकडे मार्गाची दिशा बदलली आहे. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी दक्षिण मध्य आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. द.म. रेल्वेच्या नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार, पायाभूत सुविधाप्रमुख नीरज अग्रवाल, म.रे.चे उपअभियंता आर. के. यादव, मराठवाडा रेल्वे कृति समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर ते नगर या नवीन मागार्साठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड पाठपुरावा केला. या मागार्चा आर्थिक अंतर्गत परताव्याचा दर नकारात्मक आलेला आहे. प्रथम एकेरी आणि आता थोडासा मार्ग बदलून दुहेरीकरणाचा डीपीआर नोव्हेंबरपर्यंत तयार होत असल्याने २०२५ ऐवजी आता २०२६ च्या अर्थसंकल्पात त्याचा विचार होईल. संभाजीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास वेगाने सुरु आहे. दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही दिशेला रेल्वे स्थानकाच्या इमारती आहेत. दोन्ही इमारतीच्या ट्रॅकदरम्यान तब्बल ५० हजार स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे. चार ठिकाणी दादरा, विमानतळाप्रमाणे रेस्टारंट, प्रशासकीय इमारत, कमर्शियल गाळे राहणार आहेत. रेल्वेस्थानकावर सध्या सोळा डब्यांच्या पीटलाईचे काम सुरू असून त्याचे ऑक्टोबरमध्ये उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे.
ऑक्टोबर अखेरपर्यंत रेल्वे बोर्ड देशभरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांच्या सूचना हरकती मागवून त्यावर नोव्हेंबरमध्ये अंतिम स्वरूप दिले जाते. मागील काळात जालना-जळगाव नवीन मार्गाची प्रक्रिया अंतिम झाली. केंद्र-राज्य पन्नास टक्के सूत्र त्यात ठरले. छत्रपती संभाजीनगर-नगर मार्ग केंद्र राज्य सूत्र अथवा संपूर्ण मार्ग केंद्र सरकार करणार यासंबंधी डीपीआरनंतर निर्णय होईल.या मागार्मुळे संभाजीनगर-साजापूर-आंबेलोहोळ-येसगाव-बाबरगाव-गंगापूर-जामगाव-देवगड-नेवासा-उस्थल दुमला-खारवांडी- शनिशिंगणापूर-मोरे चिंचोरे-ब्राह्मणी-वांबोरीपर्यंत १३ स्टेशन राहणार आहेत.
मुकुंदवाडी येथे भुयारी मार्ग प्रस्तावित
संभाजीनगर ते परभणी या १७५ किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी डीपीआर तयार करण्यात येणार आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाचा विकास करणे, मुकुंदवाडी जवळ दोन्ही बाजूने टेकडी असल्याने त्यावरून स्लॅप टाकून रस्ता मोकळा केला जाणार आहे. मुकुंदवाडी येथे ३ मीटरचा म्हणजे सुमारे १९ फूुट रुंदीचा भुयारी मार्गही प्रस्तावित आहे. बीड पैठण छत्रपती संभाजीनगर तसेच पुढे वेरुळ, कन्नड, चाळीसगाव असा हा मार्ग राहणार आहे.