अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश
-माल पाठवणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : शहरात मुंबहून ट्रॅव्हल्सव्दारे अंमली पदार्थांचा पुरवठा करणाºया रॅकेटचा शनिवारी पोलिसांनी पदार्फाश केला. यावेळी पोलिसांनी १० हजार रुपयांच्या मेफेड्रोन ड्रग्जसह नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. यासाठी शनिवारी पहाटे पंचवटी चौकात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून मुंबईवरून माल पाठवणाऱ्या नगमा या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईवरून ट्रॅव्हल्समार्फत शहरात नशेचे पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती एनडीपीएस पथकास मिळाल्यानंतर पथकाने १० ऑगस्ट रोजी पहाटे पंचवटी चौकात सापळा रचला. या वेळी सना ट्रॅव्हल्सची संशयित बस त्या ठिकाणी पहाटे पोहोचली. तेथे ट्रॅव्हल्सच्या चालकाकडून पेढ्याचा बॉक्समध्ये अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी एनडीपीएसच्या पथकाने केलेल्या या कारवाईत २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये मेफेड्रोन, बटणचा समावेश आहे. याशिवाय ज्या ट्रॅव्हल्समध्ये माल आला ती ट्रॅव्हल्ससुध्दा पोलिसांनी यावेळी जप्त केली.
रेल्वेच्या धडकेने मेंढपाळासह 22 मेंढ्या मृत्यू
राज ठाकरेंच्या ताफयावर सुपाऱ्या फेकल्या प्रकरणी गुन्हा दाखल
मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 568 मिमी पावसाची नोंद
अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश: मुंबईच्या नगमा बाजीकडून केला जाणारा पुरवठा ट्रॅव्हल्स कंपनीचा एजंट अझहर खान याच्या सांगण्यावरून सुरू आल्याचे पुढील तपासात निष्पन्न झाले आहे. बायजीपुऱ्यात राहणारा अझहर मुंबईच्या नगमा शेख ऊर्फ बाजी हिच्याकडून माल घेऊन सिकंदरला देत होता. या प्रकरणी अंमलदार लालाखान पठाण यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात आरोपी सिकंदर शेख, शब्बीर शेख,अफरोजखान, अझहरखान आणि नगमा ऊर्फ बाजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस पीएसआय संदीप शिंदे, महेश उगले यांच्या पथकाने केली.
पेढ्याच्या बॉक्समध्ये अमली पदार्थांचा पुरवठा
अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश: मुंबईवरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सचालकांना हाताशी धरून पेढ्याच्या बॉक्समध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करणाºया मुंबईतील नगमा ही महीला आरोपी सिकंदरला एमडीचा पुरवठा करीत असल्याचे समोर आले आहे. याबदल्यात या मालासाठी सिकंदर प्रत्येक ग्रॅममागे तिला दोन हजार रुपयेप्रमाणे रक्कम पाठवत होता,असे सांगितले जात आहे. त्यामुळे नगमा या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
तीन जण पोलिसांच्या ताब्यात
ट्रॅव्हल्समधुन आलेल्या बॉक्सची तपासणी केल्यानंतर आतमध्ये ५ ग्रॅम एमडी आणि बटणच्या १०२ गोळ्यांचा साठा आढळला. याप्रकरणी पथकाने नारेगावमधील पटेलनगरमध्ये राहणारा मध्यस्थ सिकंदर खाजा शेख, बस चालक शब्बीर शेख शफी शेख आणि क्लिनर अफरोजखान निजामखान या तिघांना अटक केल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.