बीड शहरातील कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य

-बिल थकल्याने टेरा-मेरा कंपनीकडून कंत्राट घेण्यास नकार

0

बीड शहरातील कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य

-बिल थकल्याने टेरा-मेरा कंपनीकडून कंत्राट घेण्यास नकार

बीड : शहराती स्वच्छता करण्यासाठी एक वषार्पूर्वी टेरा-मेरा कंपनीला दिलेले कंत्राट संपून १२ दिवस झाले. या झालेल्या व्यवहारात १२ महिन्यांत कंपनीला केवळ ४ महिन्यांचे बिल मिळाले असून पालिकेकडे या कंपनीचे ३ कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे ही कंपनी पुन्हा टेंडर घेण्यास नकार देत आहे. मागील १२ दिवसांपासून पालिकेच्या केवळ ७ घंटागाड्यांवर शहराच्या स्वच्छतेचा कारभार अवलंबून आहे. शहरात दररोज ७२ टन कचरा निघत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे ४० टन कचरा शहरात पडून राहत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

सर्वत्र घाणीचे साम्राज्य: नीता अंधारे यांनी एक वषार्पूर्वी मुख्याधिकारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याने १३५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरी बसवले होते. यानंतर ५२ पैकी २५ घंटागाड्या कमी करून केवळ २७ घंटागाड्या ठेवल्या. त्यामुळे वर्षभरापासून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साठत आहेत. त्यात मागील १२ महिन्यांपासून स्वच्छतेचे कंत्राट संपल्याने २७ घंटागाड्या, २४ ट्रॅक्टर, जेसीबी, टेम्पो अशी स्वच्छतेची यंत्रणा ठप्प झालेली आहे.

बीड शहरातील कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य: महिन्यातून एकदा घंटागाडी शहरातील शिंदेनगर भागात पालिकेच्या वतीने सुविधा पुरवल्या जात नाहीत. रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न कायम असताना आता घंटागाडीही महिन्याला एकदा येते. गेल्या आठवड्यात येथील महिलांनी मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या दालनात रस्त्यासाठी ठिय्या मांडला होता. मात्र एकही प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. सध्या मुख्याधिकारी नीता अंधारे या पालिकेत न येता त्या घरूनच कारभार चालवत आहेत. त्यामुळे इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारीही वेळेवर पालिकेत येत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना आपले प्रश्न कोणाकडे मांडावेत हा प्रश्न पडतो.

कंत्राटदाराने काम थांबवले

पालिकेला १४ व्या वित्त आयोगामधून ८ कोटींचा निधी मिळत होता. मात्र १५ व्या वित्त आयोगातून गेल्या दीड वषार्पासून निधी मिळाला नाही. सध्या १२ दिवसांपासून कंत्राटदाराने काम थांबवले आहे. आम्ही आहे त्या यंत्रणेवर काम करून घेत आहोत. मुख्याधिकारी सोमवारी कंत्राटदारांचा प्रश्न मार्गी लावतील, असे स्वच्छता प्रमुख राहुल टाळके म्हणाले.

१६० स्वच्छता कर्मचारी कार्यरत

पालिकेच्या ७ घंटागाड्या, २ जेसीबी, कचरा कुंड्या उचलणारा एक टेम्पो आणि ३७ कचरा कुंड्या व १६० स्वच्छता कर्मचारी एवढीच यंत्रणा बीड शहरात ५२ प्रभागात स्वच्छतेसाठी कार्यरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.