एकनाथ शिंदे दुतोंडी मांडूळ – उध्दव ठाकरे यांची बोचरी टीका

- उध्दव ठाकरे यांची बोचरी टीका

0

एकनाथ शिंदे दुतोंडी मांडूळ – उध्दव ठाकरे यांची बोचरी टीका

ठाणे : मला नागाचा अपमान करायचा नाही पण हे मांडूळ आहे, गांडूळ नाही दुतोंडी मांडूळ. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांडूळ आहे. हे तिकडे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही, फोन आला की यांची पँट खराब होते. नशीब पँट घातलेली असते, अशा शेलक्या शब्दात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली. ते मेळाव्यात बोलत होते.

ठाण्यात आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात संबोधित करताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ठाणे उभं राहिलं त्यामागे शिवसेनाप्रमुखांचं प्रेम आणि शिवसैनिकांची अपार मेहनत आहे. ही मेहनत झाली नसती तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती. दुबार मतदार नोंदणीचा मु्द्दा आत्ता राजन विचारेंनी उपस्थित केला आणि तो योग्य आहे. तीन महिने थांबा, सरकारी जिल्हाधिकारी मिंध्याचे कलेक्टर मी कुठे पाठवतो बघा. या चांडाळ चौकडीला तुरुंगाचे गज मोजायला लावू, असा इशारा त्यांनी दिला.

एकनाथ शिंदे दुतोंडी मांडूळ – उध्दव ठाकरे यांची बोचरी टीका:
जे येतं आहे ते सगळं गुजरातला वळवलं जातं आहे. जे तोतया आहेत त्यांची वळवळ आपल्याला थांबवावी लागेल. मोदींसमोर जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. शेतकरीही हक्काचं मागतो आहे, भीक नाही मागत. शेतकºयाला विचारा तो सांगेल मला कष्टाचे पैसे हवेत. माता-भगिनींना १५०० रुपयांची भीक देत आहात का? आम्हाला हक्काचं पाहिजे पण हक्क मारायचा, स्वाभिमान मारायचा आणि कोपरावर गूळ लावायचा, हे धोरण सरकारचे असल्याचा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.

आयुर्विम्यावर जीएसटी लावला

अजूनही राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता तर आयुर्विम्यावरही जीएसटी लावला आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. जिंदगी के बाद भी जीएसटी कशासाठी भरायचा? कुणाच्या खिशात जाणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.