दौलताबादमध्ये बिबट्या रेस्क्यू सेंटरची उभारणी

0

दौलताबादमध्ये बिबट्या रेस्क्यू सेंटरची उभारणी

– ११ कोटींच्या निधीची उपलब्धता

छत्रपती संंभाजीगनर : शहरात मागील आठवड्यांपासून फिरणाºया बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा बिबट्या पकडण्यासाठी सध्या पुणे व नाशिकमधील बिबट्या रेस्क्यू सेंटरच्या कर्मचाºयांना पाचारण करण्यात आले आहे. दौलताबादेत अडीच एकरात बिबट रेस्क्यू सेंटर उभारले जात आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांतून रेस्क्यू टीम बोलावण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी राज्य शासनाने ११ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

नोव्हेंबर २०२५ पर्यंत हे सेंटर उभे राहील. यात वन्य प्राण्यांसाठी ओपीडी, आॅपरेशन थिएटरसह रेस्क्यू व्हॅनही उपलब्ध असेल, अशी माहिती वन विभागाने दिली. ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट्स सेंटर (टीटीसी) म्हणजेच वन्यजीव व प्राण्यांवरील प्राथमिक उपचार केंद्र असावेत, अशी मागणी २०१५ पासून करण्यात येत होती. महामार्गावर हरणांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसायची. यासाठी महिन्याकाठी १० ते १५ हजार रुपये खर्च करावे लागत होते. त्यामुळे टीटी सेंटर व रेस्क्यू सेंटरची मागणी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.