335 शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा
कर्मचाऱ्यांच्या लालचीपणामुळे शेतकरी आडचणीत
फुलंब्री : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांच्या लालचीपणामुळे शेतकऱ्यांची कामे नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. याप्रकरणी जनसुनावणी होऊन रोहियो विभागातील कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त मुख्याधिकारी सुनिल भोकरे यांनी घेऊन कर्मचाऱ्यांना खडसावले होते. या प्रकरणी माजी जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन प्रकरणे मार्गी लावा अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकारी विकास मिना यांना दिला होता. यामुळे ३३५ शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या १८ जागा लढविणार
ज्ञानराधा बँकेच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा
मुख्यमंत्री यांच्या कृतज्ञता सोहळ्याची आंबेडकरी समाजाकडून घोषणा
335 शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा: येथील पंचायत समिती कार्यालयात रोहियो विभागात कंत्राटी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम मार्गी लावत नसल्याने शेतकरी विहीर, गोठा या सह विविध लाभाच्या योजनासाठी कायम पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारून परेशान झाले होेते. यामध्ये सुमारे 700 वैयक्तिक लाभाच्या विहिरी तर सुमारे अकराशे गाय गोठ्याची प्रकरणे प्रलंबित होते. याप्रकरणी अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांची भेट घेऊन सदर प्रकार त्यांना सांगितला होता. यानंतर त्यांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना निवेदन देऊन रोयोची प्रलंबित कामे त्वरित मार्गे लावा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू
संबंधित रोहयो विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसात कामे मार्गी लावून माहिती पुस्तिका तयार करा असे सांगितले होते. त्यावरून गेल्या पंधरा दिवसात सुमारे साडेतीनशे कामाच्या माहिती पुस्तिका तयार करण्यात आल्या असल्याची माहिती फुलंब्री रोजगार हमी विभागाने दिली असून 335 शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.