अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा
-गुन्हा दाखल न झाल्यास प्रकाश महाजन यांचा आंदोलनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : अकोला येथे मिटकरी आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या राड्यानंतर जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकाराला अमोल मिटकरी हेच जबाबदार असल्याचा दावा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. अजित पवार यांना महायुतीमध्ये राहायचे नाही, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही देखील आंदोलन करू, असा थेट इशाराही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे.
प्रवीण दरेकरांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न: मनोज जरांगे
माजी खा. इम्तियाज जलील यांच्या तीन नेत्यांच्या भेटी
घरकुलासाठी ५ ब्रास वाळू देण्याच्या योजनेचा एकच लाभार्थी
यावेळी प्रकाश महाजन म्हणाले की, अमोल मिटकरी एका वैधानिक पदावर आहेत त्यांच्याकडे असा कुठला पुरावा आहे की राज ठाकरेंनी सुपारी घेतली. बेछूट आरोप करणं ही मिटकरींची सवय आहे. अनेकदा भाजपा नेत्यांवरही ते बोलतात. २ दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पुण्याच्या पूरपरिस्थितीवर विधान केले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माझे नेते राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटलं. साधी गाडी फोडली तर उमेश पाटील म्हणतात, राज ठाकरेंना अटक करा, खटला भरा, मग एखादा मृत्यू झाला तर यांच्या नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळे अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही मागणी करतोय असं सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी संतप्त भूमिका मांडली आहे.
मिटकरीमुळे बळी गेला
अमोल मिटकरींनी तोंडाला संयम ठेवावा असे अजित पवारांनी मागे सांगितले होते. त्यांनी संयम सोडला त्यामुळे आमच्या तरूण कार्यकर्त्याचा नाहक बळी गेला, असेही प्रकाश महाजन म्हणाले.