अलिगड मुस्लिम विद्यापीठात गोळीबार
-दोन कर्मचारी जखमी
अलिगड मुस्लिम विद्यापीठात गोळीबार
-दोन कर्मचारी जखमी
अलिगड : उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) च्या मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर रजिस्ट्रार आॅफिसमध्ये तैनात कर्मचाºयांवर गोळीबार झाला. गोळी लागून दोन्ही कर्मचारी जखमी झाले असून, जखमी कर्मचाºयांना जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेने विद्यापीठ परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेनंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय पोलिस अधिकारी घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणी ‘उच्च’ दिलासा
शेतकºयांना संसदेच्या गेटवर रोखल्याने राहुल गांधी संतप्त
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे प्रॉक्टर डॉ. वसीम अली यांनी सांगितले की, एएमयूच्या मेडिकल कॉलनीतील रहिवासी मोहम्मद नदीम आणि मोहम्मद करीम हे रजिस्ट्रार कार्यालयात कार्यरत आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजता मेडिकल कॉलनीत हल्लेखोरांनी दोन्ही भावांवर गोळीबार केला. गोळी लागल्याने दोन्ही भाऊ जखमी झाले. एएमयूच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या मोबाईल टीमने घटनास्थळ गाठून दोन्ही जखमी भावांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
शिवछत्रपतींच्या नाटकासाठी तुरुंगात जायला तयार – मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना