चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक

-एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई

0

चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक

-एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यातील बलूच गल्लीत गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून एमआयडीसी सिडको पोलिसांनी १५ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा ६३.८२२ किलो गांजासह एक चारचाकी, मोबाइल असा सुमारे २१ लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्यांमध्ये विजय सांडू गायकवाड कुंभेफळ, शेंद्रा एमआयडीसी) आणि करण शिवाजी जाधव (वसंतनगर, जाधववाडी) अशी नावे आहेत.

शहरातील महालपिंप्री ते चिकलठाणा रोडवर एका पिकअपमधून गांजाची तस्करी केली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून विजय गायकवाड, करण जाधव या आरोपींना अटक केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन: खासगी क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष
NEET2024: १ लाख लोकसंख्येमागे एमबीबीएसच्या १० जागा आवश्यक
स्मार्ट मीटर बसवणार सरकारी कार्यालयांमध्ये

१५ लाख रुपयांचा गांजा जप्त

पिकअपमध्ये ७ पोत्यांमधून सुमारे १५ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा गांजा आणण्यात येत होता. त्यासह आरोपींचे २ मोबाइल आणि पिकअप असा सुमारे २१ लाख १९ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, काय आहे प्रकरण?
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला

गांजाची नशा हि समाजाची दुर्दशा

गांजा विक्री करून कांही लोक पैसे कमावत आहेत परंतु तरुण पिढीचे आयुष्य संपवत आहेत. यामध्ये शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी तर कांही अट्टल गुन्हेगार याना गांजा पुरवत आहेत. रु. १० ते ५० रुपयांच्या कमाईसाठी सर्रास तरुणांच्या आयुष्याची उधळण करीत हा व्यापार जोमाने सुरु आहे. कांही खेडे गावातील मुले शिक्षणासाठी शहरात आलेले असतात मात्र पालकांचे लक्ष नसल्याने हे मुले नशेच्या आहारी जातात. शहरी तसेच ग्रामीण भागातही आता गांजा सहज मुलांना उपलब्ध होत आहे. समाज प्रगती करीत असतानाच गंजासारखा अंमली पदार्थ हा खुलेआम विकला जातोय हि समाजाच्या प्रगतीस मोठा अडथळा आहे.

पालकांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे

गांजा बनवणारे, त्यास विक्री करणारे, बाळगणारे अशा सर्व गुन्हेगारांवर कायद्याने कारवाई व्हायला हवी. युवक वयाच्या १४ ते १८ वर्षांमध्ये अशा चुकीच्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात. मित्रांकडून, मित्रांच्या ओळखीने अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. यात ग्रामीण भागातील मुलांचे जास्त आकर्षण असते. अशा मुलांना योग्य समुपदेशनाने या अडचणीतून बाहेर काढणे आवश्यक आहे.

लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र
दररोज पोहण्याचे 8 फायदे पहाच

Leave A Reply

Your email address will not be published.