लिंग बदल शस्त्रक्रिया एक विषाणू आहे
-टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांचे मत
नवी दिल्ली : टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी लिंग बदल शस्त्रक्रियेबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हटले की, लिंग बदल शस्त्रक्रिया ही मूलत: मुलाची हत्या आणि नसबंदी आहे. हा एक विषाणू आहे. यावेळी ते अमेरिकन समालोचक जॉर्डन पीटरसन यांच्या संवाद साधत होते.
हे पण पहा
यूट्यूबर ध्रुव राठीविरोधात गुन्हा दाखल
सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली तर भारताला ८२ वे स्थान
अर्थसंकल्पात सूडभावनेतून महाराष्ट्राला वगळले
एलॉन मस्क यांचा मुलगा झेवियरने २०२२ मध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याचे लिंग बदलले. यानंतर झेवियरने आपले नाव बदलून विवियन जेना विल्सन असे ठेवले. यानंतर वडील एलॉन मस्क यांच्याशी तिला कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असे तिने सांगितले होते. विवियनने तिच्या नावातून मस्क काढून तिच्या आईचे आडनाव वापरले होते. मुलगा ते मुलगी होण्यासाठी अर्ज केल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला होता.
डेडनेमिंग
यावेळी मस्क म्हणाले की, कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान त्यांना फसवून त्यांच्या मुलाचे लिंग बदलण्यासंबंधी कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली होती. मला कळत नव्हते की काय होणार आहे. त्यावेळी कोरोनामुळे बराच गोंधळ उडाला होता. मला सांगण्यात आले की माझा मुलगा आत्महत्या करू शकतो. या शस्त्रक्रियेला ‘डेडनेमिंग’ म्हटले जाते कारण यामुळे मुलाचा मृत्यू होतो. शस्त्रक्रियेनंतर मी माझा मुलगा गमावला.