तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज मतदान करणार नाही – मनोज जरांगे पाटील
- मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूरातून शरद पवार यांच्यावर निशाणा
तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज मतदान करणार नाही
– मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूरातून शरद पवार यांच्यावर निशाणा
सोलापूर : मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधताना नारायण राणे आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आता तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नसल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. सोलापूर येथील शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील हे बोलत होते.
या शांतता रॅलीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भाजपमधील मराठे हे जर खरे मराठे असतील तर ते मराठा समाजाच्या बाजूनेच बोलतील. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलणार नाहीत.
हे पण वाचा
आम्ही विरोधकांकडे का जायचे? सत्ता तुमची आहे -मनोज जरांगे पाटील
आजचा मराठा हा मुळचा कुणबी; कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत – डाॅ. श्रीमंत कोकाटे
स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले : मनोज जरांगे
आम्ही विरोधकांकडे का जायचे? सत्ता तुमची आहे -मनोज जरांगे पाटील
आजचा मराठा हा मुळचा कुणबी; कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत – डाॅ. श्रीमंत कोकाटे
स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले : मनोज जरांगे
तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा
आम्ही आमच्या जातीलाच बाप मानतो आणि तुम्ही तुमच्या नेत्याला बाप मानतात. हा तुमचा आणि आमच्या संस्कारातला फरक असल्याचे सांगून मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. मराठा समाजातील आंदोलकांवर देवेंद्र फडणवीस यांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व सहा प्रमुख पक्षातील मराठा समाजातील नेते आता त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार नसल्याचा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांना इशारा देताना जरांगे पाटील म्हणाले की, ९६ कुळी मराठा समाजाला बोलणारा तू कोण? कोकणातला एक नेता भिंतीकडे पाहून बोलत असल्याची टिका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मी मॅनेज होत नाही म्हणून विरोधकांकडून माझी बदनामी केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
जातिवंत मराठा घरात बसू शकत नाही
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातिवंत मराठा यापुढे घरात बसू शकत नाही. स्वत:च्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने मराठा समाज उभे राहणार आहे. त्यामुळे ते कोणीच आता कोणत्याच पक्षाचा प्रचार करणार नाही, असा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
शहरातील शाळांना सुट्टी जाहीर
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात शांतता रॅली झाली मात्र यापूर्वीच प्रशासनाने सोलापूर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. या रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली.