सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता

सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करणार असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

0

सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता

सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करणार असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्या म्हणाल्या की, सोने आणि मौल्यवान धातूंच्या दागिन्यांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवण्यासाठी सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्के आणि प्लॅटिनमवरील ६.४ टक्के करण्याचा प्रस्ताव देते. त्यामुळे गगनाला भिडलेल्या सोन्याचा दर आता नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. तसेच प्लॅटिनमवरील सीमाशुल्कही ६.४ टक्क्यांनी कमी होणार आहे. याचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या दरात कमी होण्याची शक्यता आहे.

मोदींना मराठा द्वेषाची डनगाळी
मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे कोझिकोडमध्ये मुलाचा मृत्यू

सीमा शुल्कावरील कपातील सोन्याची किंमत खाली येऊ शकते. परिणामी ग्राहकांची माणगी वाढू शकते. मागणी वाढल्यानंतर विक्रीचं प्रमाण वाढले आणि सुधारित टॉपलाईन आणि बॉटमलाईन कामगिरीद्वारे सोन्याचे व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल, असंही विघ्नहर्ता गोडल्चे अध्यक्ष आणि संस्थापक महेंद्र लुनिया म्हणाले. यासंदर्भात पुढे ते म्हणाले, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतातील सोन्याची एकूण आयात अंदाजे २.८ लाख कोटी रुपये होती. १५ टक्के आयात शुल्क दराने उद्योगाचा सीमाशुल्क भरणा अंदाजे ४२ हजार कोटी रुपये आहे.

मराठा समाजाला आरक्षण बाबत सरकार सकारात्मक
अर्थसंकल्पीय अधिवेशन: खासगी क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष

सोन्या चांदीच्या सीमा शुल्कात घट

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस कमोडिटीडचे प्रमुख हरेश व्ही मिंटला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने देशांतर्गत किंमती कमी होऊ शकतात. त्यामुळे मागणी वाढणार आहे. सोन्या चांदीवर सध्या १५ टक्के सीमाशुल्क आहे. यामध्ये १० टक्के मुलभूत कस्टम ड्युटी, ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर समाविष्ट आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू काय म्हणाले मोदी?

Leave A Reply

Your email address will not be published.