मराठा समाजाला आरक्षण बाबत सरकार सकारात्मक
-सरकाला वेळ देण्याची मंत्री धनंजय मुंडेंची मागणी
मराठा समाजाला आरक्षण बाबत सरकार सकारात्मक
-सरकाला वेळ देण्याची मंत्री धनंजय मुंडेंची मागणी
बीड : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यायला हवा, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता, मराठा बांधवांना ८०% आरक्षण मिळाले असल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर आता केवळ २०% साठी सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा बांधवांना ८०% आरक्षण मिळालेले आहे. आता २०% साठी सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का? या मागे काही वेगळे काही आहे का? याची शंका ही आमच्या मनात उपस्थित होत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
महाश्रमदान संकल्पासाठी वृक्ष लागवड करा
राज्यातील सत्ताधारी भाजप नेत्यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रविण दरेकर यांना तमाशातील नथ नसलेली मावशी असा उल्लेख करीत समाचार घेतला. त्या मंत्री मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रीया देताना सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का ? असा असावा उपस्थित केल्यान मनोज जरांगे यावर काय प्रतिक्रीया देतात याकडे लक्ष लागले आहे.