विहिर मंजूर करा अन्यथा खुर्ची खाली करा
-शेतकऱ्यांच्या वतीने पंचायत समिती अधिकाऱ्यांना इशारा
विहिर मंजूर करा अन्यथा खुर्ची खाली करा
-शेतकऱ्यांच्या वतीने पंचायत समिती अधिकाऱ्यांना इशारा
खुलताबाद : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात गाय गोठे विहिरी प्रकरणासाठी अर्ज दाखल केले आहेत. या प्रकरणावर तत्काळ मंजूरी द्या, या मागणीसाठी आम आदमी पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने खुलताबाद शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकºयांनी प्रलंबित गोठे-विहिरी प्रकरणे मंजूर करा अन्यथा खुर्ची खाली करा, अशा घोषणा देत गोठे, सिंचन विहिरी मंजूर न केल्यास पंचायत समिती अधिकारी यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने पंचायत समिती अधिकाऱ्यांना देण्यात आला.
संत ज्ञानेश्वर उद्यानात निकृष्ट काम – कामाची चौकशी करण्याची माजी आमदार संजय वाघचौरे यांची मागणी
भोंदूगिरी करणाऱ्या संताची पोलखोल करून आकंठ अंधश्रद्धेत बुडालेल्या तमाम बहुजनांना विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा ग्रंथ : ‘संत बन गये भोगी!’
या दरम्यान गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे उपस्थित नव्हते. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करत गटविकास अधिकारी यांच्या दालनात दोन तास ठिय्या घातला. या वेळी पक्षाचे आप प्रदेश युवा संघटनमंत्री सतीश लोखंडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सल्लाहूद्दीन नेहरी आदींसह पदाधिकारी हजर होते.