नांदेडकडे जाणारा गुटखा आष्टीत जप्त
बीड : अहमदाबाद येथून नांदेडकडे जाणारा गुटखा आष्टी पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतला आहे. यात चालक व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल संतोषसिंग ठाकूर (२१, राहूलनगर, अब्दीमंडी दौलताबाद, ता. छत्रपती संभाजीनगर), कडुबा रघुनाथ आसवार (मालेवाडी, दौलताबाद) अशी ताब्यात घेतलेल्यांची चालक व क्लिनरची नावे आहेत. आष्टीचे पोलिस पेट्रोलिंग करीत असताना आयशर (एमएच २० सीजी ५८५४) या वाहनातून नांदेडकडे गुटखा जात आहे, अशी माहिती मिळाली होती.
बीडमध्ये मल्टिस्टेटविरोधात ४ हजार ठेवीदार रस्त्यावर
शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत -लक्ष्मण हाके यांची पवारांवर टीका
Homeताज्याजात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिने मुदत जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिने मुदत – मनोज जरांगे यांच्या मागणीला यश
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून हे वाहन व दोघांना ताब्यात घेतले. अहमदाबाद येथून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून गुटख्याचे बॉक्स करुन हा गुटखा नांदेडकडे नेला जात होता, परंतु आष्टी पोलिसांनी हा गुटखा पकडला आहे. ही कारवाई एसपी अजयकुमार बन्सल, एएसपी आयुष नोपानी, डीवायएसपी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड आदींनी केली आहे.
गुटखा कुणाकडून आला हे चौकशीत येईल समोर गुटखा कोण घेत होता, कुणाकडून आणला, मध्ये किती चालक बदलले, गुटख्याचा मूळ मालक कोण हे चौकशीत समोर येईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी दिली आहे.