सिल्लोड शहरात पाळीव मोकाट जनावरांचा हैदोस

0

सिल्लोड शहरात पाळीव मोकाट जनावरांचा हैदोस

-जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

सिल्लोड : शहरातील सार्वजनिक रस्त्यावर व नागरी वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाळीव मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन छोटे मोठे तसेच अपघात होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी त्या जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

मोकाट जनावरांचा हैदोस: शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांच्या झुंडी रस्त्याच्या मधोमध बसलेल्या असतात. यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात होऊन वाद निर्माण होत आहेत. याबाबत अनेकदा विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या वतीने तक्रारी करूनदेखील या जनावरांचा कुणीही बंदोबस्त करीत नसल्याने ही जनावरे मुख्य रस्त्यावरून आता नागरी वसाहतीमध्ये जात आहेत. यामुळे नागरी वसाहतीत राहणाºया नागरिकांना महिलांना, लहान मुलांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. यासाठी अशा जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा

शहरातील सार्वजनिक ठिकाणी व नागरी वसाहतीत फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, या पाळीव मोकाट जनावरांचा त्यांच्या मालकांनी योग्य तो बंदोबस्त करावा, नसता सार्वजनिक रस्त्यावर व इतर ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अशी जनावरे ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.