मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
– भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
छत्रपती संभाजीनर : विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये विदभार्तील काही भागांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिसरातील काही भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक भागात पाणी साठले आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विदर्भातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनर , बीड, जालना जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
हे पण वाचा
विदर्भातील नागपूरमध्ये गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. ज्या परिसरात नवीन काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे त्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच नाग नदीच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी खचली होती. या भिंतीच्या डागडुजीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. मात्र आता या ठिकाणाहून पाणी यायला लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच नागपूरमधील शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान विभागाने भंडारा, छत्रपती संभाजीनर, बीड आणि जालना जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. यातील भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या मुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील शहर, ग्रामीण भागातील शाला कॉलेज यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
गडचिरोलीत नद्यांना महापूर
सतत दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने दक्षिण गडचिरोलीतील काही उपनद्या आणि नाल्यांना पूर आला असून, दोन प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. सिरोंचात अतिवृष्टी झाल्याने तेथील विद्यार्थी आणि अन्य नागरिकांसह एकूण ११२ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.