बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणी ‘उच्च’ दिलासा

जाणून घ्या काय आहे प्रकरण?

0

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणी ‘उच्च’ दिलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्यासाठी ममताने मुंबई हायकोर्टात याचिका दखल केली होती. वर्ष २०१६ मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात ममतावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे हायकोर्टाने कुलकर्णीला दिलासा दिला आहे. या प्रकरणाची कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे त्यावर अनेक वर्षे सुनावणी देखील झाली नव्हती.

राहुल गांधी संतप्त: शेतकऱ्यांना संसदेच्या गेटवर रोखल्याने
शिवछत्रपतींच्या नाटकासाठी तुरुंगात जायला तयार

या प्रकरणातील गहाळ झालेल्या कागदपत्रांचा न्यायालयीन कर्मचारी शोध घेत असल्याची माहिती हायकोर्टाच्या रजिस्ट्रारांनी न्यायालयाला दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवण्यात यावीत आणि दोन्ही पक्षकारांनी रजिस्ट्रारांना मदत करावी असे निर्देश दिले होते. मात्र तरीदेखील या प्रकरणातील कागदपत्रे सादर होऊ शकली नाहीत. परिणामी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने ममता कुलकर्णीची याचिका स्वीकारत तिच्यावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

अर्थमंत्री अजित पवार आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात वाद?
महाराष्ट्रातील गोरबंजारा ( विमुक्त जाती-भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास!

ममताचे अनेक हिट चित्रपट

ममता कुलकर्णी मागील अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिने करण अर्जुन, गँगस्टर, तिरंगा, दिलबर, वक्त हमारा है, भूकंप, सबसे बडा खिलाडी असे अनेक हिट चित्रपट ममताने ९० च्या दशकात दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.