भुमरेंकडून गृह मंत्रालयाचे संकेत पायदळी तुडवले? माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे

-परमिट रूमच्या व्हॅटमध्ये वाढ केल्याचा भुमरेंवर आरोप

0

भुमरेंकडून गृह मंत्रालयाचे संकेत पायदळी तुडवले

-परमिट रूमच्या व्हॅटमध्ये वाढ केल्याचा भुमरेंवर आरोप

छत्रपती संभाजीनगर : येथील नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी रोहयोमंत्री असताना पदाचा दुरुपयोग करत विविध जिल्ह्यांत पाच वाइन शॉप घेतले. मंत्र्यांच्या कुटुंबीयांत असे लाभ कुणीही घेऊ नयेत, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे संकेत त्यांनी पायदळी तुडवले आहेत. वाइन शॉपचा धंदा वाढवण्यासाठी परमिट रूमच्या व्हॅटमध्ये 5 टक्कयांची वाढ करून १० टक्के केल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

यासंदर्भात दत्ता गोर्डे यांनी २९ जुलै २०२४ रोजी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी भुमरेंवर उत्पन्नाच्या तुलनेत अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप केला आहे. यावेळी ते म्हणाले, एक वाइन शॉप घेण्यासाठी किमान १ ते २ कोटी रुपये खर्च येतो. मग भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना व पुण्यात प्रत्येकी १ आणि जळगावमध्ये २ असे ५ वाइन शॉप कसे काय विकत घेतले? त्यातील तीन त्यांच्या सून वर्षा विलास भुमरे यांच्या, तर पत्नी पुष्पा यांच्या नावावर २ वाइन शॉप आहेत, असे म्हटले आहे. यामुळे मंत्री भुमरे यांच्या आडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

खासदारांची शिक्षिका सून दारू विकू शकते?

खासदार भुमरे यांनी लोकसभा निवडणूक शपथपत्रात २ कोटींची मालमत्ता असल्याचे खोटे सांगितले. मग पैठण शहरात १ कोटी ६ लाखांची तर वळदगावात १.९६ कोटींचे प्लॉट कसे विकत घेतले? दुकानांसाठी दिलेले पैसे एकत्र केले तर ७ कोटींपेक्षा अधिक संपत्ती होते. यामध्ये सून वर्षा ही शिक्षिका असताना विद्यार्थ्यांना शिकवणे सोडून दारू कशी काय विकू शकते, असा आरोप त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.