नांदेडमध्ये तयार होणाऱ्या राष्ट्रध्वजाला देशभरातून मोठी मागणी
ध्वज विक्रीतून खादी ग्राम उद्योग समितीला मिळत कोठ्याावधीचं उत्पन्न
नांदेडमध्ये तयार होणाऱ्या राष्ट्रध्वजाला देशभरातून मोठी मागणी
ध्वज विक्रीतून खादी ग्राम उद्योग समितीला मिळत कोठ्याावधीचं उत्पन्न
नांदेड : येथील खादी ग्राम उद्योग समितीकडून तयार केल्या जाणाÚया राष्ट्रध्वजाला देषभरातून मोठी मागणी आहे. नांदेडमध्ये 1993 पासून ध्वजनिर्मिती होते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन टप्यात नांदेडमध्ये राष्ट्रीय ध्वज तयार केला जातो. स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील 16 राज्यातील शासकीय कर्यालयावर नांदेड जिल्ह्याात बनवलेला राष्ट्रीय ध्वज फडकत असतो. हे नांदेडसाठी अभिमान वाटण्यासारखे आहे. 15 ऑगस्ट अवघ्या आठ दिवसावर येऊन ठेपल्याने खादी ग्राम उद्योगमध्ये राष्ट्रीय ध्वज तयार करण्याच्या कामाला मोठा वेग आला आहे. आतापर्यंत 50 लाख ध्वजांची निर्मिती करण्यात आली आहे. जवळपास 25 लाख रूपयांच्या ध्वजांची विक्री झाल्याची माहिती मराठवाडा खादी ग्राम उद्योग समितीकडून देण्यात आली आहे. यामुळे नांदेडकरांसाठी ही खुप मोठी आनंदाची गोष्ट आहे.
लंडनच्या ‘The Asian Age’ दैनिकाने घेतली जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची दखल
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का
प्रिय बहिण विनेश तू गोल्ड पेक्षा ही खूप काही देऊन गेली आहेस
राष्ट्रध्वजाची निर्मिती देशात दोन ठिकाणीच केली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड आणि कर्नाटकातील हुबळी या केंद्राचा समावेश आहे. वर्षभरात ध्वजाची निर्मिती होत असते. विशेष म्हणजे नांदेडमध्ये तयार झालेला राष्ट्रीय ध्वज महाराष्ट्रासह दिल्ली, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलगंणा, छत्तीसढ, गुजरात, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, तामिळनाडू, मध्यप्रदेश यासह इतर राज्यातील शासकीय कार्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकतो.
अशोक स्तंभ कलंकित करणारे हात ध्वजाचा गौरव करू लागले ? नवनाथ दत्तात्रय रेपे
बहुजन समाजाला मोतिबिंदू झाला का ? नवनाथ दत्तात्रय रेपे भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
ध्वजनिर्मितीसाठी लातूर जिल्हयातील उदगीर येथील संस्थेच्या केंद्रात तयार होणाऱ्या कोऱ्या खादी कापडाचा उपयोग केला जातो. सुरुवातीला कोरा खादी कपडा अहमदाबाद (गुजरात) येथे शासन मान्यताप्राप्त बीएमसी मिलमध्ये पाठवण्यात येतो. याठिकाणी तीन रंगात स्वतंत्र ताग्याच्या स्वरूपात कपडा तयार होतो. त्यानंतर शासन निर्धारित प्रमाणकानुसार कापडाची क्षमता यंत्रावर तपासली जाते. त्यानंतरच ध्वजनिर्मितीसाठी त्या कापडाचा उपयोग होतो. दरम्यान, स्क्रीन पेंटिंगच्या साहाय्याने ध्वाजावर अशोक चक्र उमटवण्यात येते. ध्वजासाठी वापरण्यात येणार्या दोरीला घट्ट धरुन ठेवण्यासाठी गरडीचा उपयोग केला जातो. ही गरडी हलदी, साल, साग, शिसम या लकडापासून तयार केलेली असते. दोरी मुंबईवरुन मागविण्यात येते. पावसात भिजली तरी, ती खराब होत नसल्याचे सांगण्यात आले. या सर्वप्रक्रियेला दोन महिने लागतात, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
ध्वजाचा आकार
नांदेड येथील खादी ग्राम उद्योग समितीकडून तयार करण्यात येणारा सर्वात मोठा ध्वज 14 बाय 24 फूट आकाराचा असतो. तर अन्य ध्वज 8 बाय 21 फूट, 6 बाय 9 फूट, 3 बाय साडेचार फूट, 2 बाय 3 फूट आणि साडेसहा इंच बाय 9 इंच पर्यंतच्या एवढ्याा आकाराचा ध्वज तयार केला जातो. दरवर्षी या ध्वज विक्रीतून समितीला कोठ्याावधीचं उत्पन्न मिळत असते.
Image Credit: Pixabay.com