पाक संसदेत उंदरांचा धुमाकूळ उपाय म्हणून शिकारी मांजर तैनात

-कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने यासाठी १२ लाख रुपयांचे बजेट

0

पाक संसदेत उंदरांचा धुमाकूळ उपाय म्हणून शिकारी मांजर तैनात


-कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने यासाठी १२ लाख रुपयांचे बजेट

इस्लामाबाद :
पाकिस्तान हा अगोदरच अनेक प्रश्नांमुळे अडचणीत असून ज्यात कि राजकीय कुरघोडी, महागाई, दहशतवाद, आर्थिक मंदी, भूखमारी, आणखीन त्यात पाकिस्तान मध्ये गाढवांच्या संख्येत 2023-24 मध्ये 5.9 दसलक्ष एवढी आश्चर्यकारक वाढ झालेली आहे. असे अनेकानेक समस्या असताना “उंदीर” हा एक मोठी समस्या आहे. कारण पाकिस्तानच्या संसदेत उंदरांचा धुमाकूळ माजला आहे.

पाकिस्तानच्या संसदेच्या कार्यालयामध्ये मांजरांना न घाबरणारे मोठमोठे उंदरांचा धुमाकूळ माजविला आहे. जेंव्हा समितीच्या बैठकीत जुने रेकॉर्ड तपासण्यासाठी सागितले गेले तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला. कारण जुने रेकॉर्ड्स उंदरांनी कुरतडून खराब केले आहेत असे सांगण्यात आले. नॅशनल असेंब्लीचे प्रवक्ते जफर सुलतान यांनी म्हंटले कि ज्या मजल्यावर जुने रेकॉर्ड आहेत तेथे इतके मोठे उंदीर आहेत कि ते मांजरानाहि घाबरत नाहीत.

पाकिस्तान सरकारने या उंदरावर आणि इतर किटकांवर उपाय म्हणून 1.2 दसलक्षचे बजट दिलेले आहे. पाकिस्तानच्या CDA कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने उंदीरवर उपाय म्हणून शिकारी मांजरांना नेमले आहे. आणि मांजराना रोखण्यासाठी जाळीदार खिडक्या तयार केल्या आहेत.

अशीच परिस्थिती 2017 मध्ये नवी दिल्लीच्या पूर्व महापालिकेत उद्भवली होती. उंदरांनी अन्नासोबतच कामाच्या फायली खाल्ल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने फायली ठेवण्यासाठी धातूच्या कपाटांचा वापर करण्यात आला होता. परिस्थिती इतकी बिकट होती की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयात सापळा रचला होता.

पाक संसदेत उंदरांचा धुमाकूळ उपाय म्हणून शिकारी मांजर तैनात :
सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. त्यात आता येथील संसदेत उंदरांची संख्या वाढल्याने सरकारने या उंदरांचा सामना करण्यासाठी शिकारी मांजरी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने यासाठी १२ लाख पाकिस्तानी रुपयांचे बजेट दिले आहे.

यासंदर्भात पाकिस्तानी वाहिनी जिओ टीव्हीने सोमवारी ही माहिती दिली. संसदेतील उंदरांची संख्या सातत्याने वाढत आहे. या उंदरांनी सिनेट आणि नॅशनल असेंब्लीच्या विभागांमधील अनेक महत्त्वाच्या आणि गोपनीय फायली कुरतडल्या आणि नष्ट केल्या. तसेच तारा कापून ते संगणकाचे नुकसान करत असल्याने कामात आडथळा निर्माण होत आहे. या उंदरांचा नायनाट करण्यासाठी खासगी तज्ज्ञांची मदत घेण्याचाही सीडीएचा विचार आहे. या उंदीरांना पकडण्यासाठी विशेष प्रकारचे जाळीचे सापळे बसविण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.