मी छत्रपतींचे हिंदुत्व चालवतो, भाजपचे जातीच्या विरोधातले हिंदुत्व नाही – मनोज जरांगेे पाटील

मनोज जरांगेे पाटील यांचा भाजपच्या हिंदुत्वाला विरोधात एल्गाार

0

मी छत्रपतींचे हिंदुत्व चालवतो, भाजपचे जातीच्या विरोधातले हिंदुत्व नाही – मनोज जरांगेे पाटील

मनोज जरांगेे पाटील यांचा भाजपच्या हिंदुत्वाला विरोधात एल्गाार

जालना : भाजप नेते नारायण राणे यांनी मी मराठवाड्यााच्या दौऱ्यावर येत असून मनोज जरांगे काय करतो हे बघायच आहे, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांना आव्हाण दिले. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मी यावर प्रतिक्रीया देणार नाही असे म्हणत विषय टाळला. मात्र करमाळा येथे भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांना नारायण राणे यांच्यावर बोलताना शब्द सांभाळून बोल अन्यथा जशासतसे उत्तर देईन, असे इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राणे कुटुंबियांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. भगवा कोणी वापरावा आणि छत्रपतींच्या पुतळ्याासमोर कोणी बसाव हे आम्हाला चांगल कळत. आम्ही छत्रपतींचे विचार आणि छत्रपतींचे हिंदुत्व चालवतो. भाजपचे जातीच्या विरोधातले हिंदुत्व आम्ही चालवत नाहीत, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी जणू भाजपच्या हिंदुत्वाला विरोधात एल्गाार दिला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या नादाला लागून मला चॅलेज देऊ नका ही शेवटची संधी देतो. लवकर शहाणे व्हा. हे जे चालवल आहे ते सर्व देवेंद्र फडणवीस याने चालविले आहे, हा दररोज मराठ्याांच्या नेत्यांपुढे तुकडे फेकुन मराठ्याामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मराठे नक्की धडा शिकवतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीसने अजूनही विचार करावा असे मनोज जरांगे म्हणाले.

छत्रपतींचे हिंदुत्व चालवतो

मनोज जरांगे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गळ्याातील भगवा काढावा असे नितेश राणे म्हणाले होते त्यावर प्रतिक्रया देताना मनोज जरांगे म्हणाले की, छत्रपतींच्या विचारांनीच राणेसारख्या अन्याय करणाऱ्यांना वठणीवर आणयची शिकवण दिले आहे. भगवा हा तेजस्वी आहे, हे राणेंना कधीच कळणार नाही. मोदींच्या गळ्याात भगव्याच तेज पडले होते त्यांना छत्रपतींचा समुद्रात आशिर्वाद मिळाल्याने ते देशाच्या सर्वोच्च पदावर बसले होते. मला उगाच अंगावर घेऊ नका मी जर एकदा मागे लागलो तर काही खर नाही, माझ्याविरोधात नेत्यांना बोलायला लावणे हे दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी चालविलेले अभियान आहे. भाजपने सोडेलेले मराठ्याांविरोधातील डाकू सध्या बोलत आहेत.

नारायण राणे देवेंद्र फडणवीससाठी करतात आणि मी जातीसाठी करतोय. राणेंना 96 कुळी कशाला म्हणतात हे तरी माहीत आहे का? ज्या समाजावर अन्याय आणि अत्याचार होतो त्यांच्या पाठिशी उभे राहणाराला 96 कुळी मराठा म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे उभे राहून नुसते आम्हाला आरक्षण नको आम्ही 96 कुळी मराठा म्हणतो. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आया बहीणीवर गोळ्याा घालून त्यांना रक्तभंबाळ केल त्याविरोधात 96 कुळी क्षत्रिय मराठा उभा राहतो. खरा 96 कुळी मराठा देवेंद्र फडणवीसच्या बाजून उभा राहत नसतो. त्यामुळे कुणाला शिकवतो 95 कुळी आणि 96 कुळी, असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितेश राणेंचा खरपूस समाचार घेतला.

राणेंच्या लेकरांचे हाल नाहीत इथे गरीब मराठ्याांचे खुप हाल आहेत. नारायण राणे समाजाच्या जीवावर खुप मोठे झाले त्यामुळे त्यांच्या परदेशातही व्यवसाय आहेत. त्यांना सगळ मराठ्याांच्या जीवावर ऐष्वर्य मिळाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याचे ऐकून मराठ्याांच्या अन्नात माती कालवू नका. तुम्हाला आरक्षण कळत नसल तरी आम्हाला ते कळत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे ऐकूण माझ्यावर नका बोलू नाहीतर या महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांना दिला.

गोंडे आणि फोंडे बदगे मी पावलापावलावर गुंडाळतो

अनिल बोंडे यांचा समाचार घेताना मनोज जरांगे म्हणाले की आम्ही जर बोंडेच्या मतानुसार जर कुत्री असू तर मराठ्याांच्या विरोधात बोलण्यासाठी सोडलेले अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे कुत्री नाहीत का? असले गोंडे आणि फोंडे बदगे मी पावलापावलावर गुंडाळूून टाकतो, मी अशाला मोजतही नाही, असे रोज गुंडाळून टाकतो असे म्हणत त्यांनी भाजपच्या अनिल बोंडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नारायण राणेंनी गावबंदीच्या काळात यायला पाहिजे होते

नारायण राणेंना मी येऊ नका असे कुठेही म्हणालो नाही, यांनी गावबंदीच्या काळात यायला पाहिजे होते, म्हणजे समजले असते असे मनोज जरांगे म्हणाले. देंवेंद्र फडणवीस याने राजीनामा देऊन घरी जाऊन बसावे आम्ही त्याला शब्दही बोलणार नाहीत. आम्ही सत्तेत असणारालाच भांडणार. गावातील कोणत्या गोष्टीसाठी कोण माजी सरपंचाच्या घरी जाऊन त्याला भांडतो का? असे मनोज जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.