पालकमंत्री, महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा सुरू

अवैद्य वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची सुद्धा वाहने ? :तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज

0

पालकमंत्री,महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा सुरू

अवैद्य वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची सुद्धा वाहने ? :

तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज

परळी (वार्ताहर) : कृषिमंत्री, महसूल प्रशासन ,पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने गोदापात्रात अवैद्य वाळू उपसा चालू असून हा वाळू उपसा तात्काळ थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केली आहे .परळी तालुक्यातील गोदाकाटच्या डिग्रस गावात व गावाच्या बाहेर गोदाकाठी रोडवर रात्रीची टोळकेची टोळके बाहेरचे लोक जाऊन त्या गावांमध्ये वेगळीच दहशत निर्माण करून हा अवैध्य वाळू उपसा करत आहेत.

सध्या पावसाळ्यात गोदापात्राला पाणी आले आहे त्या पाण्यामध्ये सर्रासपणे नदीपात्रात अवैद्य बोट उतरून बोटीद्वारे वाळू उपसा चालू असून या अवैध्य वाळू उपसा करण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचा पूर्णपणे आशीर्वाद असून अनेक महसूल व पोलीस प्रशासनातले अधिकाऱ्यांच्या गाड्या हा अवैध्य वाळू उपसा करण्यासाठी आहेत असे माहितीशीर वृत्त असून याबद्दलची पूर्ण माहिती लवकरच पुराव्यानिशी समोर आणणार असून या विरोधात जन आंदोलन उभा करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.