परळीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय

- मुक्कामासाठी घ्यावा लागतोय नाथ प्रतिष्ठाणच्या मंडपाचा आधार

0

परळीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय

– मुक्कामासाठी घ्यावा लागतोय नाथ प्रतिष्ठाणच्या मंडपाचा आधार

परळी : वैद्यनाथ तिर्थक्षेत्र विकास योजनेतुन परळीतील जुन्या तहसिलच्या जागेवर ८० खोल्यांच्या भक्तनिवासाची मागील तीन वर्षांपासुन उभारणीचे काम अद्यापही सुरुच असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. या कामासाठी लागणाºया निधीत वाढ करुनही हे भक्तनिवास अपूर्ण असल्याने परळीत दर्शनासाठी येणाºया भाविकांना महिलांसह नाथ प्रतिष्ठाणने रस्त्यावर उभारलेल्या मंडपात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या बॅनरसमोर मुक्काम करावा लागत आहे.

परळी वैजनाथ तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या मंत्री असताना १३३ कोटींचा आराखडा मंजुर करण्यात आला होता. यावेळी शासनाने २० कोटी रुपये मेरुगिरी पर्वत, दक्षिणमुखी गणेश मंदिराच्या पाठिमागे, डोंगरतुकाई मंदिर परिसरात शौचालय उभारने, वैद्यनाथ मंदिराभोवती दगडी फरशी बसवणे, नगरपालिकेसमोर प्रवेशद्वार उभारणे, मेरुगिरी पर्वताभोवती संरक्षण भिंत बांधणे, डोंगरतुकाई येथे भुयारी मार्ग, यात्री निवास, अन्नछत्र जवळ, दोन दिपमाळ उभारणे,शहरातील चार मुख्य रस्त्यावर चार कमानी, १२ मिटर उंचीचे हायमाष्ट उभारणे व जुन्या तहसिलच्या जागेवर ३२० यात्रेकरुंना थांबता येईल अशा ८० खोल्यांच्या यात्री निवासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. यानंतर काही महिन्यांनी यात्री निवास उभारणीचे काम सुरु करण्यात आले.

यानंतर राज्य सरकार बदलल्यानंतर याच आराखड्यास नविन रुप देत निधी वाढवून आणण्यात आला. मात्र सदरील यात्री निवासाचे काम अद्याप पुर्ण न झाल्याने दर्शनासाठी येणाºया भाविकांना मुक्कासाठी मोठी आडचण येत आहे.

गुत्तेदारास राजकिय वरदहस्त

सध्या पवित्र श्रावणमास सुरु असून प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शहरात देशभरातुन भाविक येत आहेत. या भाविकांना मुक्कामाची सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. त्यात यात्री निवास उभारणीचे काम तीन वर्षांपासुन सुरु असले तरी गुत्तेदारास राजकिय वरदहस्त असल्याने नगरपालिका प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.