शहरातील मोकाट जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

-वाहनधारकांसह जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

0

शहरातील मोकाट जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

-वाहनधारकांसह जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

जालना : छाईपुरा भागातील कोंडवाडाच राहिला नसल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर झाली आहे. रस्त्यांवर फिरत असलेल्या मोकाट जनावरांना मनपाकडून शहराबाहेर सोडल्याही जात नाही. यामुळे जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे शहरातील मुख्य चौकांमध्ये जनावरांचा ठिय्या असतो. यामुळे वाहनधारकांसह पादचारी, विद्यार्थ्यांना अपघात होईल, या भीतीने जीव मुठीत धरुन ये-जा करताना दिसत आहेत. यामध्ये झालेल्या अपघातात मागील सात महिन्यांत १३ जण जखमी झाले आहेत.

शहरात असलेले रस्ते हे मुळात अरुंद आहेत. त्यात रस्त्यावर जनावरांचे बस्तान बसल्याने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे शहरात जागोजागी वाहतूक खोळंबण्याचे प्रकार घडतात. मोक्याच्या ठिकाणी या जनावरांचे कळपच दिसून येतात. यामध्ये शहरातील मामा चौक, सिंधी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंमादेवी परिसर, गांधी चमन, बसस्थानक परिसर, नूतन वसाहत, सतकर कॉम्प्लेक्स, अंबड चौफुली, संभाजी उद्यान रोड, चंदनझिरा आदी परिसरात जनावरांचा ठिय्या असतो. या ठिकाणाहून ये-जा करणाºयांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या या जणावरांना काही व्यापारी सकाळच्या सुमारास हिरवा चारा खाऊ घालतात, तर काही जणांनी हे जनावरे पाळलेली आहेत. दिवसभर शहरात फिरून ही जनावरे सायंकाळी घरी जातात. चाऱ्याचा खर्च टाळण्यासाठी जनावरे मोकाट शहरातील मोकाट जनावरांचे अनेकजण मालक आहेत, परंतु चारा टाकायचा खर्च वाचतो म्हणून अनेक जण जनावरांना शहरातील विविध भागांत सोडून जातात. अनेक जनावरे दुभते असल्याने हे जनावरे सायंकाळच्या सुमारास मालकाच्या घराकडे परत येतात.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

जालना शहरातील मुख्य चौकांमध्ये बसणाऱ्या या जनावरांमुळे दुचाकी, रिक्षातून पडून १३ जण जखमी झाले आहेत. यामुळे जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.