2018 ते 2024 काळात भारतीय नागरिकत्व सोडून देणारांच्या संख्येत वाढ

- परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

0

2018 ते 2024 काळात भारतीय नागरिकत्व सोडून देणारांच्या संख्येत वाढ

– परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली :  भारतीय नागरिकत्व सोडून देणारांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. नागरिकत्व सोडण्यामागची कारण ही वैयक्तिक असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहेत. यासंदर्भात पंजाबचे खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
भारतीय नागरिकत्व सोडून बहुतांश लोक अमेरिकेत जात आहेत. २०१८ ते २०२३ च्या मध्यापर्यंत भारतातून ३,२८,६१९ भारतीयांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारले आहे. याशिवाय १,६१,९१७ जणांनी कॅनेडियन आणि १,३१,८८३ जणांनी ऑस्ट्रेलियन नागरिकत्व स्विकारले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

२०२३ मध्ये २ लाख १६ हजार लोकांनी नागरिकत्व सोडले

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, २०१९ मध्ये १,४४,०१७ भारतीयांनी नागरिकत्व सोडल्याचे सांगितले आहे. तर २०२० मध्ये ८५२५६ लोकांनी, २०२१ मध्ये १,६३,३७० आणि २०२२ मध्ये २,२५,६२० लोकांनी नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. याशिवाय गेल्या वर्षी २०२३ मध्ये २ लाख १६ हजार लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याचे मंत्रालयाने सांगितले.

Image Credit: pixabay

Leave A Reply

Your email address will not be published.