नवीन आणि भावी पिढ्यांमध्ये देशभक्तीची भावना कशी जागृत कराल?

देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी 7 मजेदार प्रयोग

0

नवीन आणि भावी पिढ्यांमध्ये देशभक्तीची भावना कशी जागृत कराल?

देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी 7 मजेदार प्रयोग

नवीन आणि भावी पिढ्यांमध्येही देशभक्तीची भावना जागृत करणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तुम्ही मुलांसोबत करू शकता अशा कांही 5 मजेदार प्रयोग सुचवीत आहोत.

दरवर्षी, संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. बरेच लोक या प्रसंगी पतंग उडवतात आणि इतर मिठाई आणि स्नॅक्स देऊन उत्सव साजरा करतात.

1. ध्वजारोहण समारंभ

15 ऑगस्ट रोजी तुम्ही तुमच्या राहत्या भागात, गल्लीमध्ये, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीमध्ये, इमारतीमध्ये ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करू शकता. भागातील सर्व मुलांना आमंत्रित करून ध्वजारोहण सोबतच राष्ट्रगीत गाण्यास आणि देशभक्ती गीत गाण्यास प्रोत्साहित करा. किंवा स्पीकरवर देशभक्ती गीत वाजवू शकता. यामुळे लहान मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होईल.

2. देशभक्ती वरील चित्रपट पहा

स्वातंत्र्यदिनी आपल्या मुलांसोबत देशभक्तीवरील चित्रपट पाहू शकता. द लीजेंड ऑफ भगत सिंह, मंगलपांडे, मदर इंडिया, रंगदे बसंती असे चित्रपट पाहू शकता.
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षावर लक्ष केंद्रित करतात.

3. ऐतिहासिक ठिकाणी भेट

स्वातंत्र्याशी निगडीत ऐतिहासिक ठिकाणांभोवती फिरण्याची योजना करा. तुम्ही अशा ठिकाणांना एक छोटीशी भेट देऊन तुमच्या मुलांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगू शकता.

4. देशभक्तीपर गाणी

देशभक्तीचे गीत घरामध्ये स्पीकरवर चालवा, किंवा मुलांसोबत दोन देशभक्तीपर गीत गा आणि कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र सादर करा.

5. कथाकथन आणि कथालेखन

आपल्याला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती आहुती द्यावी लागली आहे याचे ज्ञान लहान मुलांना द्या. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा मुलांना सांगा. तुम्ही मोठ्या मुलांना स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनाविषयी छोट्या कथा किंवा कविता लिहिण्यास प्रोत्साहित करू शकता.

6. प्रभात फेरीत सहभाग

लहान मुलांना शाळेतून निघणाऱ्या प्रभात फेरीत सहभागी होऊ द्या किंवा प्रभात फेरीत सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. शाळेच्या प्रशासनास भेटून प्रभात फेरी काढण्यासाठी विनंती करा. आणि देशभक्ती घोषवाक्यच्या घोषणा देण्यास प्रोत्साहित करा.

7. तिरंगा असलेले चित्र

लहान मुलांना चित्रे काढणे रंग भरणे खूप आवडते. त्यांना आपले कलागुणांचा वापर करून विविध प्रकारे तिरंगा बनविण्यास प्रोत्साहित करा. वेगवेगळ्या रंगीत वस्तूंचा वापर करून तिरंगा बनविण्यास सांगा.

अशा प्रकारचे प्रयोग करून आपण आपल्या मुलांमध्ये म्हणजेच भावी पिढीच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत करू शकता. आणि हे केलेच पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.