भारताला 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळण्याची शक्यता – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
- २०२७ पर्यंत यजमानपदाचा निर्णय
भारताला 2036 ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळण्याची शक्यता
– 2027 पर्यंत यजमानपदाचा निर्णय
नवी दिल्ली : २०३६ मध्ये खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडे यजमानपद मिळण्याची शकयता असल्याने त्याची उत्सुकता लागली आहे. २०३६ चे खेळ भारतात झाले तर देशातील क्रीडा संस्कृती झपाट्याने वाढेल आणि नवीन खेळाडूंना खेळात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळेल, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. त्या राष्ट्रपती भवनात माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, कबड्डीसारख्या खेळाचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला पाहिजे. ऑगस्टमध्येच संपलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने ५ कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण ६ पदके जिंकली होती. मला खेळ बघायला आवडतात, पण ते पाहण्याच्या फारशा संधी मिळत नाहीत. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मला फक्त भारतीय खेळच बघायला आवडतात. यावेळी २०३६ ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतातच व्हायला हवी. त्यांच्या आगमनाने भारतीय खेळाडू सक्षम होऊन त्यांना खेळ खेळण्यासाठी प्रेरणा मिळेल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्ट रोजी आपल्या भाषणात ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी देश ऑलिम्पिकसारख्या शो-पीस कार्यक्रमाचे आयोजन करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर मोदी म्हणाले होते, २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणे, हे भारताचे स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही तयारीही सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
२०२७ पर्यंत यजमानपदाचा निर्णय
२०२८ चे ऑलिम्पिक खेळ अमेरिकेत आणि २०३२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहेत. २०३६ गेम्सच्या यजमानपदाचा निर्णय झालेला नाही, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती २०२६ किंवा २०२७ पर्यंत यजमानपदाचा निर्णय घेऊ शकतो. यामध्ये भारताशिवाय सौदी अरेबिया, पोलंड, इंडोनेशिया, मेक्सिको आणि कतार हे देशही यजमानपदासाठी दावेदार आहेत.