तुर्कीमध्ये इन्स्टाग्रामवर बंदी
-२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानंतर इंस्टाग्रामचे डोमेन ब्लॉक
नवी दिल्ली : युरोपीय देश तुर्कीने २ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशात तुर्कीमध्ये सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर बंदी घातली आहे. या आदेशानंतर तुर्की सरकारने इंस्टाग्रामचे डोमेन ब्लॉक केले आहे. मात्र तुर्की सरकारने इन्स्टाग्रामच्या बंदीबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
इंदूर येथील शाळेत कपडे काढून तपासणी केल्याची खळबजनक घटना
काँगेसच्या वतीने मंत्री अनुराग ठाकूर विरोधात निदर्शने
शरद पवारांसोबत तुमचे बोलण काय झाले? – मराठा मावळा संघटना
तुर्कीच्या नॅशनल कम्युनिकेशन अथॉरिटीने आपल्या वेबसाइटवर पोस्ट करून इन्स्टाग्रामच्या बंदीबाबत माहिती दिली. या आदेशानंतर तुर्की सरकारने डोमेन ब्लॉक केले आहे. त्यामुळे या देशातील अनेक लोकांनी इन्स्टाग्राम फीड लोड होत नसल्याबद्दल तक्रार करत इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. तुर्कीच्या अध्यक्षीय कार्यालयातील कम्युनिकेशन डायरेक्टर फहरेटिन अल्तान यांनी बुधवारी इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा यांनी हमास प्रमुख इस्माईल हानीयेह यांच्या मृत्यूबद्दल लोकांना शोक संदेश पोस्ट करण्यापासून रोखल्याचा आरोप केला.
तुर्कस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार तुर्कस्तानची एकूण लोकसंख्या अंदाजे ८.५ कोटी आहे. इंस्टाग्रामवर लादण्यात आलेल्या बंदीमुळे ५ कोटी यूजर्स प्रभावित झाले आहेत. अशा परिस्थितीत तुर्की लोकसंख्येचा मोठा भाग इन्स्टाग्राम वापरतो. मात्र सरकारने यावर बंदी घातली आहे.
इस्माईल हानियेह यांचे निधन
इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्माईल हानियेह यांचे मंगळवारी निधन झाले. इस्रायलच्या हल्ल्यात इस्माईल हानियेह मारले गेले. हनियेह हे तुकीर्चे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्याही जवळचे होते.