शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण

-भारताशिवाय संघटनेच्या इतर सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांनाही आमंत्रण

0

शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण

-भारताशिवाय संघटनेच्या इतर सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांनाही आमंत्रण

इस्लामाबाद : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट शिखर परिषदेसाठी पाकिस्तानने पंतप्रधान मोदींना इस्लामाबादला येण्याचे निमंत्रण दिले आहे. १५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तान इसीओ बैठकीचे आयोजन करणार आहे. या बैठकीसाठी भारताशिवाय संघटनेच्या इतर सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी या बैठकीसाठी इस्लामाबादला जातील की नाही हे पाहणे म्हत्वाचे आहे. मोेदी आपल्या एखाद्या मंत्र्याला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पाठवू शकतात असे सांगितले जात आहे. मागील वर्षी, किर्गिस्तानची राजधानी बिश्केकने इसीओ च्या सीएचजीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी भारताच्या बाजूने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. यावेळी पीएम मोदी या वर्षी ३-४ जुलै रोजी कझाकिस्तानमध्ये झालेल्या इसीओ शिखर परिषदेला उपस्थित राहिले नव्हते. यावेळीही त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

२०१५ मध्ये मोदींकडून नवाझ शरीफ यांची भेट

मागील वर्षी गोव्यात एससीओच्या बैठकीला पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान मोदी यांनी अखेरची लाहोरला २०१५ मध्ये अचानक भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.