जालना-जळगाव रेल्वेमार्गाचे काम 2031 पर्यंत होईल

-निधीची अडचण नसल्याची माजी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची माहिती

0

जालना-जळगाव रेल्वेमार्गाचे काम 2031 पर्यंत होईल

-निधीची अडचण नसल्याची माजी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची माहिती

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने शुक्रवारी जालना-जळगाव रेल्वेमार्गांच्या खर्चाला मंजुरी दिली. हा नव्या रेल्वेमार्गांपैकी सर्वात जास्त लांबीचा प्रकल्प आहे. यासाठी आता निधीची कोणतीही अडचण नाही. २०३१ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. त्यासाठी आता भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल, अशी माहिती माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.

जालना येथे पत्रकारांशी संवाद साधताना माजी मंत्री दानवे यांनी जालना-जळगाव रेल्वेमार्गांसंदर्भात माहिती दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बद्री पठाडे, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, संध्या देठे आदींची उपस्थिती होती. आपण गेली तीन वर्षे सतत पाठपुरावा करून या प्रकल्पाचा सर्व्हे, प्रकल्प अहवाल तयार केला. नंतर हा अहवाल नीती आयोग, रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिल्याने हा प्रकल्प मराठवाड्यातील विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

भूसंपादन वेळेतच पूर्ण होईल

या रेल्वे मागार्साठी आता भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आवश्यक निधी मिळालेला असल्याने भूसंपादन वेळेतच पूर्ण होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार नसल्याचे दानवे यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, हा प्रकल्प २०३१ पूर्वी पूर्ण केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.