पिस्तुल वापरणाऱ्यावर जालना पोलिसांची कारवाई

- मागील दीड वर्षात २६ पिस्तुलांसह ३९ बुलेट जप्त

0

पिस्तुल वापरणाऱ्यावर जालना पोलिसांची कारवाई

-मागील दीड वर्षात २६ पिस्तुलांसह ३९ बुलेट जप्त

जालना : पिस्तुल वापरणाऱ्यावर जालना पोलिसांची कारवाई – शहरात मागील काही महिन्यांपासून तलवारी, गावठी पिस्तुलांचा सर्रासपणे वापर वाढल्याचा घटनेत वाढ झाली आहे. या अनुषंगाने जालना पोलिसांच्या कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवंसापूर्वीच पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. या आरोपीने हे पिस्तूल परराज्यातील एका जणाकडून १३ हजारांत खरेदी केल्याचे समोर आले. मागील दीड वर्षात २६ पिस्तुलांसह ३९ बुलेट पोलिसांनी जप्त केल्या. यात जवळपास ३४ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

पिस्तुल वापरणाऱ्यावर जालना पोलिसांची कारवाई: शहरात ११ डिसेंबर २०२३ रोजी भरदिवसा तीन जणांनी पिस्तुलामधून गोळ्या झाडून गजानन तौर याची हत्या केली होती. या घटनेमुळे जिल्ह्यातील पिस्तुलांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता. या घटनेमुळे जालना पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत २६ पिस्तुले जप्त करण्यात आली. यात ३४ आरोपी झाले आहेत.

जिल्ह्यात तलवारी, गावठी पिस्तुले, तलवारी खरेदी-विक्रीबाबत कारवाया सुरू आहेत. यामध्ये मागील पंधरा दिवसांत २७ तलवारीसंह एक पिस्तूल जप्त केले असून विक्री करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. पिस्तूल खरेदी-विक्रीच्या प्रकरणात कारवाया सुरू आहेत. परराज्यातील मुळापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. यावर स्पेशल पथके कामेही करीत आहेत. पिस्तूल खरेदी-विक्रीच्या प्रकरणात बहुतांश आरोपी परराज्यातील आहेत. या आरोपींची सर्व माहिती मिळाली की ताब्यात घेणार आहे. त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

शहरातील लक्ष्मीनारायणपुरा या भागात राहणाऱ्या आकाश कैलास चिप्पा याने औद्योगिक वसाहतीतील एका परप्रांतीय कामगाराकडून १३ हजारात पिस्तूल खरेदीचा व्यवहार झाला. त्याला ६ हजारच दिले होते. उर्वरित रक्कम नंतर द्यायची होती. परंतु ६ महिन्यांपासून हा परप्रांतीय कामगार जालन्यात आलाच नाही, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

बनावट नावाने पिस्तूल विक्री

परराज्यातील आरोपी बनावट नावाने आणि ओळख लपवून हा व्यवहार करीत असतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह विविध राज्यांतून ट्रेन, बसच्या प्रवासाने हे पिस्तूल जालन्यात विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.