जरांगे पाटील यांनी पुस्तकांपेक्षा माणसं जास्त वाचली : इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे

प्रकाश आंबेडकरांच्या विधानांमध्ये राजकारण

0

जरांगे पाटील यांनी पुस्तकांपेक्षा माणसं जास्त वाचली : इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे

प्रकाश आंबेडकरांच्या विधानांमध्ये राजकारण

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे डाॅ. राजरत्न आंबेडकर यांनी भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेला पाठिंबा दिला. यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे भेट घेतल्यानंतर जे मुद्दे उपस्थित झाले त्यावर मनोज जरांगे पाटील आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी प्रतिक्रिया देताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं जास्त वाचली आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. यावेळी श्रीमंत कोकाटे हे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यावी, अशी खूप दिवसापासून इच्छा होती. मात्र आंदोलनामुळे आणि त्यांच्या दौऱ्यामुळे भेट घेता आली नाही. अखेर आज त्यांची भेट घेतली. त्यांना संत तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली. तर इतर महापुरुषांची पुस्तके देखील भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोकाटे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं जास्त वाचली आहेत. त्यांना मी तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली आहे. त्यामध्ये ‘बरे झाले देवा कुणब्याच्या घरी जन्माला आलो’ हा अभंग आहे. तर गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी अनेक वेळा उल्लेख केला आहे. की मी कुणब्याचा आहे. आताच्या तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत. मोरे ते मराठा असले तरी तुकाराम महाराज स्वतःचा उल्लेख कुणबी असा करतात. त्यामुळे आजचा मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी आणि मराठा काही वेगळे नाही, हेच जरांगे पाटील यांचे म्हणणं आहे, असं कोकाटे म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांच्या विधानांमध्ये राजकारण

यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेसंदर्भात विधान करताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधान धक्कादायक आणि आश्चर्यजनक आहे. प्रकाश आंबेडकर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अभ्यास आहे. समाज जोडण्यासाठी ते भूमिका घेत असतात. मात्र अशावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानांमध्ये राजकारण पाहायला मिळतं, ते तोडण्याची कधी भूमिका घेत नाहीत. मराठा समाजापासून ओबीसीला काही धोका नाही. महात्मा फुले देखील आपल्या एका पुस्तकात सांगतात की सर्व मराठा आहेत. आपण सगळे भावंडं आहोत. त्यापासून एकमेकांना काही धोका नाही.

 प्रकाश आंबेडकरांचे नाव न घेता डाॅ. राजरत्न आंबेडकर यांचा निशाणा?

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या डाॅ. राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देऊन राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेसदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना या यात्रा काढल्या जातात पण ओबीसी आरक्षणाला गरीब मराठा समाजापासून धोका नसून तो ओबीसी मधील पुजा खेडकर सारख्या श्रीमंत ओबीसीपासून असल्याचे सांगत मी देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर भूमिका बदलत नाही, असे म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता टोला लगावल्याने नवा चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.