जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 23 टक्कयांवर?

-पाच दिवसांत १९ टक्के पाणी

0

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा २३ टक्कयांवर

-पाच दिवसांत १९ टक्के पाणी

पैठण : राज्यातील नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात मागील पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने मंगळवारी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा २३ टक्कयांवर आला. मागील पाच दिवसांत १९ टक्के पाणी वाढ झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता विजय काकडे यांनी दिली. यामुळे थोड्या प्रमाणात पाणीटंचाईचा प्रश्न मिटल्याचे बोलले जात आहे.

नाशिकसह इतर परिसरात पाऊस कमी झाल्याने मंगळवारी पाण्याचा विसर्ग वरील धरणांतून कमी करण्यात आला आहे. यामुळे जायकवाडीत दाखल होणारे पाणी ३९ हजार २१५ क्युसेकवर आले आहे. सोमवारी हेच पाणी ६६ हजार क्युसेकच्या वर सुरू होते. यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाची पाणीपातळी जून व जुलैमध्ये ४ टक्कयांवर राहिली. मात्र पाच दिवसांपासून नाशिकसह इतर भागात झालेल्या पावसाने दारणा, भंडारदरा, गंगापूर ही धरणे भरली गेल्याने त्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा आता २३ टक्कयांवर गेला आहे. मंगळवारी वरील भागांतील पाऊस थांबल्याने पालखेडमधून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला.

पाऊस थांबल्याने पाण्याचा विसर्ग कमी

दारणा ३३९१ भावली २९० कडवा बंद नांदूर मधमेश्वर ७०४४ गंगापूर १५०० वरिल भागातील पाऊस थांबल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, पात्रातील पाणी येत असल्याने जायकवाडीतील साठ्यात आणखी वाढ होईल, असे अभियंता विजय काकडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.