राज्यात होमगार्ड भरती सुरु, जाणून घ्या कागदपत्रे, पात्रता व अटी

- अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख १४ ते १६ ऑगस्टपर्यंत

0

राज्यात होमगार्ड भरती सुरु, जाणून घ्या कागदपत्रे, पात्रता व अटी

– अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख १४ ते १६ ऑगस्टपर्यंत

मुंबई : राज्यात जिल्हानिहाय होमगार्ड भरती सुरु झाली असून पोलीस विभागाच्या सहकार्याने राज्यात होमगार्डसाठी नोंदणी सुरु झाली आहे. यासाठी इयत्ता दहावी पासची पात्रता आहे. जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांच्यासाठी होमगार्ड पदासाठी नोकरीची संधी आहे. यासाठी Online अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख १४ ते १६ ऑगस्टपर्यंत आहे. यामध्ये जिल्हानिहाय अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेगळी आहे. जे उमेदवार होमगार्ड म्हणून नियुक्त होतील त्यांना प्रतिदिन ८९५ रुपये भत्ता दिला जातो.
होमगार्ड ही नोकरी किंवा रोजगार नसून आपत्कालिन पस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार त्यांना बंदोबस्तासाठी कामावर बोलावले जाते. अग्निशमन, विमोचन, महामारीकाळात, संपकाळात प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात येते. यामध्ये होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जाते. या पदासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयोमर्यादा २० वर्षे पूर्ण ते ५० आहे. यासाठी लागणारी उंची पुरुषांकरता १६२ सेमी तर महिलांकरता १५० सेमी अशी आहे. तसेच छाती यामध्ये पुरुष उमेदवारांकरता न फुगविता किमान ७६ सेमी अशी आहे.
होमगार्ड भरती: पदासाठी जिल्हानिहाय नोंदणी २५ जुलैपासून सुरु झाली असून १४ ऑगस्ट या कालावधीपर्यंत मुदत आहे. यासाठी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये जिल्हानिहाय पात्रतेच्या आणि परिक्षेच्या अटी या ज्यात जिल्हानिहाय नोंदणी २५ जुलैपासून सुरु झाली असून १४ ऑगस्ट या  https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो त्याच पोलीस ठाणे अंतर्गत आणि पक्षकामध्ये अर्ज दाखल करता येणार आहे.

होमगार्ड भरतीसाठी लागणारी कागदपत्र

होमगार्डसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे

  • शाळा सोडल्याचा दाखला,
  • तांत्रिक अहर्ता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र,
  • खासगी नोकरी करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र,
  • रहीवासी पुरावा,
  • शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र,
  • जन्मदिनांक पुराव्याकरता १० बोर्ड प्रमाणपत्र,
  • ३ महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र.

बंदोबस्तात प्रतिदिन ८९५ रुपये भत्ता

होमगार्ड म्हणून नियूक्ती झालेल्या उमेदवाराला  प्रशिक्षणकाळात ३५ रु खिसाभत्ता व १०० रुपये भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी  ९० रुपये भत्ता दिला जातो. तर बंदोबस्तात असताना प्रतिदिन ८९५ रुपये भत्ता देण्यात येतो. यामध्ये बंदोबस्त काळात ५७० रुपये कर्तव्य भत्ता, १०० रुपये उपहार भत्ता दिला जातो.

Image Credit: Pixabay

Leave A Reply

Your email address will not be published.