बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी – अर्ज कसा करायचा पहा

शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा पहा

0

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी – अर्ज कसा करायचा पहा

शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा पहा

नोकरीची संधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रिक्त जागाची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण सात जागा भरण्यात येणार आहेत.यामध्ये भरण्यात येणाऱ्या ७ जागा या जागा लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. या पदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झाली असूत त्यांचा अंतिम दिनांक 12 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

यामध्ये दिनांक 12 ऑगस्ट 2024 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज जमा केले जातील. यानंतर दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी मुलाखत पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी केली जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी: शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी
मान्यताप्राप्त विद्यापीठाची (एमएसबीटीई) डीएमएलटी किंवा पीजी डीएमएलटी उत्तीर्ण असणे आवश्यक.
संगणकीय ज्ञानासाठीची एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
100 गुणांची मराठी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी : निवड प्रक्रिया

शैक्षणिक क्षेत्रातील अंतिम वर्षाच्या मुलांचे टक्केवारीनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
सदर विषयातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल
अभ्यासक्रमांमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांयांना प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवारांनी त्यांचा अर्ज सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्रे जोडून शेवटच्या तारखेपर्यंत आणि म्हणजेच 12 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. जर हा अर्ज मुदतीत प्राप्त झाला नाही तर त्यांचा अर्ज या भरतीप्रक्रियेत ग्राह्य धरला जाणार नाही.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर केली जाणारी नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने असणार आहे.
पात्र उमेदवार या पदावर सहा महिन्यांसाठी रुजू होईल.

मासिक वेतन

उमेदवाराची प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर नियुक्ती झाल्यावर त्याला दर महिना 20 हजार रूप्ये वेतन दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी पत्ता
वैद्यकीय अधीक्षक
राजवाडी रूग्णालय घाटकोपर
मुंबई 400077

Leave A Reply

Your email address will not be published.