शिक्षण विभागाच्या जम्बो पथकाची नाचनवेल केंद्राला भेट

वाड्या-वस्त्यांवर मोफत शिक्षणाची गुणवत्ता ढासळल्याचे समोर

0

शिक्षण विभागाच्या जम्बो पथकाकची नाचनवेल केंद्राला भेट

वाड्या-वस्त्यांवर मोफत शिक्षणाची गुणवत्ता ढासळल्याचे समोर

कन्नड : ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणाºया जि.प.शाळांची गुणवत्ता ढासळल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष सोयी-सुविधा, शाळांकडून बालकांचे होणारे सातत्यपूर्ण सर्वांगीन मूल्यमापन आणि बालकांचा प्रत्यक्ष अध्ययन स्तर याची शिक्षण विभागाच्या जम्बो पथकाकडून नाचनवेल केंद्रात पडताळणी करण्यात आली.
जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील २ उपशिक्षणाधिकारी, ९ गट शिक्षणाधिकारी, १५ शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या पथकाने एकाच वेळी नाचनवेल केंद्रातील सर्व चोवीस शाळांची तपासणी केली. या पडताळणीत बालकांतील इयत्तेनुसार अपेक्षित अध्ययन क्षमता, पायाभूत चाचण्यांमध्ये ठरवलेल्या अध्ययन स्तराची क्रॉस चेकिंग, शैक्षणिक साहित्याचा अध्यापनातील वापर, दैनंदिन परिपाठ,आवश्यक मूलभूत सुविधांचा दर्जा, गुणवत्ता आणि पटसंख्या वाढण्यासाठी राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम यांसह आवश्यक शालेय अभिलेखे आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

प्रयोगामुळे पालकांना सुखद धक्का

यावेळी उत्कृष्ट गुणवत्ता राखलेल्या मोहरा आणि महादेववाडी शाळांचे अभिनंदन करण्यात आले. एकाच वेळी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून अवघ्या केंद्राची तपासणी मोहीम पहिल्यांदाच राबवण्यात आल्याचे मानले जाते. शासकीय शाळांतील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या या अभिनव प्रयोगामुळे पालकांनाही सुखद धक्का बसला.

कन्नड तालुक्यातून मोहिमेची सुरवात

शाळांनी अपडेट रहावे शिक्षण विभागाच्या या मोहिमेची सुरवात कन्नड तालुक्यातून झाल्याचा मनस्वी आनंद आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून पाहणी होत असल्याने वस्तुनिष्ठ अहवाल आणि प्रभावी प्रत्याभरण करता येणार आहे.जिल्ह्यातील सर्वच शाळांनी यादृष्टीने अद्ययावत रहावे, असे उपशिक्षणाधिकारी तथा ग.शि.अ. नीता श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.