रिक्षात बिघाड झाल्याच्या तक्रारीमुळे कडूंनी अधिकाऱ्यांना कानशिलात लगावली
छत्रपती संभाजीनगर : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी घडली. समाजकल्याण विभागाने दिव्यांग बांधवांना दिलेल्या ई-रिक्षात एकाच दिवसात बिघाड झाल्याची तक्रार घेऊन काही दिव्यांग बांधव आमदार बच्चू कडू यांच्याकडे गेले होते. यावेळी संतापाच्या भरात बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.
आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याची तयारी करण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी व दिव्यांगांच्या प्रश्नावर एका मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोचापूर्वी कडू हे शहरात आले असता काही दिव्यांग बांधवांनी समाजकल्याण विभागाने दिलेल्या ई-रिक्षांमध्ये एका दिवसात रिक्षात बिघाड झाल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. त्यावर बच्चू कडू यांनी आपल्या रावडी स्टाईलने अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी रागाच्या भरात अधिकाऱ्याचा गाल लाल केला.
आमदार नारायण कुचे यांच्या भावाने धमकी दिल्याची सुसाइड नोट लिहून एकाची आत्महत्या
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा
नांदेडमध्ये तयार होणाऱ्या राष्ट्रध्वजाला देशभरातून मोठी मागणी
बच्चू कडू हे त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून नेहमीच दिव्यांग बांधवांच्या समस्यांसाठी आक्रमक भूमिका घेतात. या समस्याचे निरकरण करण्यासाठी त्यांनी अनेकदा मोर्चे सुध्दे काढले आहेत. एवढेच नाही तर ते यासंबंधी सरकारी अधिकाऱ्यांनाही अंगावर घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांनी आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेत कुणाला लॅपटॉप फेकून मारले, तर कुणाच्या श्रीमुखात भडकावली. या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. त्यानंतर आता संभाजीनगर येथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी मोर्चा अडवण्याचे धाडस करू नये
बच्चू कडू यांच्या मोर्चाला संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आल्यानंतर बच्चू कडू यांनी आपला मोर्चा कोणत्याही स्थितीत निघणार असल्याचे सांगितले. आमचा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत निघेल. त्यामुळे पोलिसांनी तो अडवण्याचे धाडस करू नये. अन्यथा आम्ही प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला आहे.